विधानभवनात राणे मुख्यमंत्र्यांना भेटले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर परतले ?

विधानभवनात राणे मुख्यमंत्र्यांना भेटले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर परतले ?

त्याचवेळी विधान भवनात नारायण राणे आले. त्यांना मुख्यमंत्री तात्काळ भेटले. उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री नारायण राणेंना भेटली ही माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचली

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण ही भेट आता रद्द झाली. उद्धव ठाकरे तब्बल अडीच तास वाट पाहुन 'मातोश्री'वर परतले. नारायण राणे यांच्यामुळे ही भेट रद्द झाल्याचं बोललं जातंय.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार होती. संध्याकाळी 5.45 ची वेळ निश्चित करण्यात आली होती. पण  विधानसभेत मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. त्यामुळे ही भेट तासाभराने पुढे ढकलण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बैठकीची वेळ पुन्हा बदलली आणि ती ६:४५ वाजता ठरली. मात्र त्याचवेळी विधान भवनात नारायण राणे आले. त्यांना मुख्यमंत्री तात्काळ भेटले. उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री नारायण राणेंना भेटली ही माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचली. त्यामुळे आधीच तासभर उशीर झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंना सरळ पाठ फिरवली. आणि तात्काळ मातोश्रीकडे रवाना झाले.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित बैठक तडकाफडकी रद्द झाली. हे समजताच विधान भवनाच्या मुख्य गेटवर स्वागतासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांमध्ये गुफ्तगू चर्चा सुरू झाली. मात्र कुणीही माध्यमांकडे न बोलता सरळ पुन्हा विधान भवनात निघून गेले. या अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे विधान भवनात राजकिय चर्चांना उधाण आलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन वरून चर्चा केली. आणि नियोजित बैठक रद्द झाल्यामुळे दिलगिरी व्यक्तं केली. आणि लवकरच पुढील बैठक करू असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2018 08:09 PM IST

ताज्या बातम्या