नाराज राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार मोठा निर्णय

नाराज राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीआधी राणेंना भाजपमध्ये घेवून कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचीही शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 21 ऑगस्ट : भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे गेले काही दिवस नाराज आहेत. त्यामुळे या भटीला महत्त्वा प्राप्त झालंय. राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार असल्याचंही बोललं जातंय. आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलतानाही राणे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. राणे नाईलाजाणे दिल्लीत गेले मात्र त्यांचं मन अजुनही महाराष्ट्रातच आहे असे संकेतच त्यांनी दिले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

खासदार नारायण राणे यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल आजच मोठं विधान केलं होतं. 'मी माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार आहे,' असं म्हणत नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे बघितलं जातंय.

'देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल'

नारायण राणे हे काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र युतीत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजपप्रवेश रोखला गेल्याची चर्चा झाली. आता मात्र विधानसभा निवडणुकीआधी राणेंना भाजपमध्ये घेवून कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचीही शक्यता आहे. कारण राणेंचा भाजपप्रवेश व्हावा यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.

'मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच भाजपमध्ये प्रवेश'

भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं पाहून मुख्यमंत्र्यांनी अद्याप राणेंच्या भाजप प्रवेशाला होकार दिलेला नाही. मात्र आता काही दिवसांतच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खबरदार! गणेशोत्सवात वर्गणीसाठी जबरदस्ती केली तर खंडणीचा गुन्हा लागणार

राणे कोकणात पुन्हा वर्चस्व मिळवणार?

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण युतीमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी राणेंना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 21, 2019, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading