राज्यसभेसाठी राणेंचं तळ्यातमळ्यात, मुख्यमंत्री आणि शहांवर सोपवला निर्णय

राज्यसभेसाठी राणेंचं तळ्यातमळ्यात, मुख्यमंत्री आणि शहांवर सोपवला निर्णय

आज राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली.

  • Share this:

06 मार्च : महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा योग्य तो निर्णय घेतील अशी बोलकी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

मागील आठवड्यात नारायण राणे दिल्लीवारी करून आले. दिल्लीत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत नारायण राणे यांना राज्यसभेची आॅफर दिल्याचं खुद्द नारायण राणे यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं होतं. आज राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली.

मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली माझं मत मी व्यक्त केलं. यावर दोन दिवसांनी सर्व चित्र स्पष्ट होईल. माझ्या विषयावर मुख्यमंत्री अमित शहा यांचीशी चर्चा होईल. दिल्लीत जाऊ नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे  तेव्हा दोन दिवसांनी कळेल अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 07:40 PM IST

ताज्या बातम्या