भाजपात जाण्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही- नारायण राणे

भाजपात जाण्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही- नारायण राणे

भाजपात जायचं की नाही, याचा निर्णय अजून मी घेतलेला नाही, पण यावेळी नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेने जायचं, यासंबंधीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. असं सडेतोड मत नारायण राणेंनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत मांडलंय.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : भाजपात जायचं की नाही, याचा निर्णय अजून मी घेतलेला नाही, पण यावेळी नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेने जायचं, यासंबंधीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. असं सडेतोड मत नारायण राणेंनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत मांडलंय. विधान परिषदेच्या गटनेतेपदासाठी अशोक चव्हाणांनी मला डावलल्यामुळेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

नारायण राणेंनी या मुलाखतीत काँग्रेस नेत्यांवर टीका करतानाच भाजप नेत्यांचं जाहीर कौतुकही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तुत्ववान नेते आहेत. त्यांच्यामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सलग 3 वर्षे मुख्यमंत्री सांभाळून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. तर नितीन गडकरी आणि माझ्यातरी मैत्री ही राजकारणापलीकडची आहे, असंही राणेंनी म्हटलंय.

नारायण राणेंची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...