S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

भाजपची आॅफर जुनीच पण काल कुणालाच भेटलो नाही -राणे

अहमदाबादला गेलो होतो पण तिथे अमित शहा यांची भेट घेतली नाही. तसंच मी मुख्यमंत्र्यांसोबत एका कारमध्ये सुद्धा प्रवास केला नाही

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2017 03:51 PM IST

भाजपची आॅफर जुनीच पण काल कुणालाच भेटलो नाही -राणे

13 एप्रिल : मी अहमदाबादला गेलो होतो पण तिथे अमित शहा यांची भेट घेतली नाही. तसंच मी मुख्यमंत्र्यांसोबत एका कारमध्ये सुद्धा प्रवास केला नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला.

अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री आणि नारायण राणे एकाच कारमधून जाऊन अमित शहांची भेट घेतल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली. मात्र, खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बातमी साफ फेटाळून लावली. मी अहमादाबादला मेडीकल काॅलेजच्या कामानिमित्त गेलो होते. हाॅटेलला उतरलो तिथून एक खासगी मर्सिडिज कार भाड्याने केली होती. त्यानेच अहमदाबादमध्ये प्रवास केला. अहमदाबादमध्ये अमित शहांना भेटलो नाही असा खुलासा नारायण राणेंनी केला.

आता मीडियात सकाळपासून मी एका स्काॅर्पिओ कारने प्रवास करत असल्याचं दाखवलं जातंय. बरं मी जरी प्रवास केला असला तरी ही कामी माझी पहिली वेळ नव्हती. याआधी चार वेळा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केलाय. दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला आणि बावनकुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केला होता. मग याचा अर्थ काही मी भाजपमध्ये प्रवेश केला असा होत नाही. एखाद्याला आपल्या पक्षात घेऊन जायचं असेल तर त्यासाठी अशी पद्धत वापरली जात नाही. खुलेआमपणे कुणाचा असा प्रवेश केला जात नाही असंही राणे म्हणाले.मी गुपचूप काही करत नाही जे आहे ते जगजाहीर आहे. आता यावेळी कोणत्या पक्षात जाणार हे आताच सांगू शकणार नाही.मात्र  संधीवर नजर ठेवून आहे. ज्यावेळेस निर्णय घ्यायचा त्यावेळेस घेईन असा सुतोवाचही नारायण राणेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close