नारायण राणेंनी केली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा

नारायण राणेंनी केली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा

नवीन पक्ष महाराष्ट्रातील सामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी माहिती राणे यांनी दिली आहे. या पक्षाचं राजकारण हे समाजाच्या उन्नतीसाठी आणि भल्यासाठी केलं जाईल असंही राणे यांनी सांगितली आहे

  • Share this:

मुंबई , 1 ऑक्टोबर: नारायण राणे यांनी  यशवंतराव चव्हाण सेंटर इथे  पत्रकार परिषद घेऊन   महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषण केली आहे.महाराष्ट्र हेच आमच्या पक्षाचं कार्यक्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.

हा नवीन पक्ष महाराष्ट्रातील सामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल  अशी माहिती राणे यांनी दिली आहे. या पक्षाचं राजकारण हे समाजाच्या उन्नतीसाठी आणि भल्यासाठी केलं जाईल असंही राणे यांनी सांगितली आहे.या पक्षाच्या चिन्ह आणि इतर बाबींबाबत लवकरच घोषणा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.हा पक्ष स्थापन करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या घटनांचा अभ्यास केलं असल्याचंही राणे यांनी सांगितलं. तसंच 'दिलेला शब्द खरा करू' हे या पक्षाचं ब्रीदवाक्य असेल असं राणेंनी सांगितलं. पण हा पक्ष युतीत जाणार की आघाडीत जाणार याबाबत त्यांनी काहीही सांगितलं नाही.

नितेश राणेच्या  निर्णयाबाबत गोपनीयता

नितेश राणे या नवीन पक्षाचा भाग असतील की नाही याबाबत मात्र राणे यांनी गुप्तता बाळगली आहे. मी ज्योतिषांनी विचारून सांगतो, असं म्हणत नितेश राणे यांच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे आता राणेच्या  पक्षाचा कोण भाग असेल आणि कोण नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बुलेट ट्रेनचं समर्थन

एकीकडे सगळ्या विरोधकांनी बुलेट ट्रेनवर टीकेची झोड उठवली असताना नारायण राणेंनी मात्र  बुलेट ट्रेनचं समर्थन केलं आहे. 50 वर्षांनी येणारी गोष्ट भारतात दोन-तीन वर्षात येत असेल तर हरकत काय असा सवालही राणेंनी उपस्थित केला. ज्यांचा काही अभ्यास नाही , ज्यांना काही करायचं नाही, त्यांनी बुलेट ट्रेनवर टीका केली आहे असा टोला ही नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. तसंच सगळी चाचपणी केल्याशिवाय जपानसारखा देश कर्ज  देणार नाही असंही राणे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका

काल दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर घणाघाती टीका राणे यांनी केली आहे. काश्मिरमध्ये भाजप लाचार आहे असं म्हणताना जीएसटी, शेतकरी आत्महत्या  यासारख्या मुद्द्यांवर राज्यात लाचार नाही का असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. तसंच नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला नाही असं काल ठाकरे म्हणाले होते. त्यावर टीका करताना मुंबई महानगरपालिकेत किती भ्रष्टाचार कमी केला असा प्रश्न  राणेंनी विचारला.पंतप्रधानांबाबत आपण कशा भाषेत बोलतो अशीही मार्मिक टीका त्यांनी ठाकरेंवर केली. तसंच उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेच खरे रावणाची भूमिका बजावत आहेत असंही राणे म्हणाले

शिवसेना हकललं तरी सत्ता सोडणार नाही

भाजपने हकललं तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही अशी टीका राणेंनी केली आहे. तसंच शिवसेनेच महाराष्ट्राच्या सत्तेतील योगदान शून्य आहे.तसंच सामाजित आर्थिक कुठल्याच क्षेत्रात शिवसेनेनं काहीही काम केलेलं नाही असा आरोप राणेंनी केला आहे. मुंबईतला मराठीचा टीका कमी होण्यासाठी शिवसेनाच जबबाबदार आहे असं विधानही राणेंनी केलं.

राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंच्या धमक्या पोकळ असल्याचा उल्लेख राणेंनी केला.  राज ठाकरेंनी आतापर्यंत काय विधायक काम केलं, असंही त्यांनी विचारलं.

 

 

 

First published: October 1, 2017, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading