मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं? संभाजीराजेंच्या भेटी-गाठींवरून नारायण राणेंची टीका

पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं? संभाजीराजेंच्या भेटी-गाठींवरून नारायण राणेंची टीका

Narayan Rane Press conference शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का असा चिमटाही त्यांनी काढला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 मे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) मुंबईत भेट घेतली. त्यानंतर मनसे (MNS Chief) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीनंतर खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी या भेटींवरून टीका केली आहे. तसंच मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.

(वाचा-Corona मुंबई, पुणे नियंत्रणात, इतर जिल्ह्यांचे आकडे चिंताजनक, नगरमध्ये 35 मृत्यू)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन संभाजीराजे चर्चा करत आहेत. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन गेल्या तीन-चार दिवसांत संभाजीराजे छत्रपती यांनी लोकांची मत जाणून घेतली आहेत. त्यानंतर ते आता मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. सकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली होती. त्यानंतर कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या भेटीवर नारायण राणेंनी टीका केली. संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केलं. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का असा चिमटाही त्यांनी काढला.

(वाचा-पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मंगळवारी बैठक)

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही असं विधान काही संभाजीराजे यांनी दिलं होतं. यावर ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं विधान बोलणं, योग्य नसल्याचं नारायण राणे म्हणाले. मराठा समाज्याला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी भाजप सरकारनं दिलं. पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी आता पुढची पावलं अत्यंत काळजीपूर्वक उचलायला हवी. सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे नाकारले आहे त्याला धरून योग्य प्रस्ताव गेला पाहिजे. तसा प्रस्ताव भाजप तयार करत असून भाजपनं काही वकील नेमल्याचंही नारायण राणे म्हणाले. विरोधीपक्ष नेते मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर करतील अशी माहिती नारायण राणेंनी दिली.

नारायण राणेंनी राज्य सरकारवर लसीकरणाच्या टेंडरवरून गंभीर आरोप केले. टेंडरमध्ये ठेकेदाराकडे टक्केनारी मागितल्याचा आरोप राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातूनही पैशाची मागणी झाल्याचा आरोप केला. कोरोना आला हे यांच्यासाठी बरं झालं, त्यांना पैसा मिळत आहे, असं राणे म्हणाले.

First published:

Tags: Maratha reservation, Narayan rane, Raj Thackeray, Sambhajiraje chhatrapati