दसऱ्याला नारायण राणेंचा भाजप प्रवेश, सेनेला टेन्शन ?

दसऱ्याला नारायण राणेंचा भाजप प्रवेश, सेनेला टेन्शन ?

सेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं महत्त्व कमी करण्याचा डाव भाजपने आखलाय असा संशय सेनेनं व्यक्त केलाय.

  • Share this:

18 सप्टेंबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजप प्रवेश करणार अशी शक्यता आहे. सेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं महत्त्व कमी करण्याचा डाव भाजपने आखलाय असा संशय सेनेनं व्यक्त केलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेच्या शिलेदारांनी 'मातोश्री'वर बैठक सुरू आहे. याबैठकीत सत्तेतून बाहेर पडण्यावरही चर्चा झाली. तशी तयारीच उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे सेनेचे दसरा मेळावा होत आहे. दसऱ्यांचं औचित्य साधून भाजपनेही राणेंच्या भाजप प्रवेशाची तयारी आखलीये.

मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं महत्त्व कमी करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशीच नारायण राणेंना भाजप प्रवेश देणार असल्याचा संशय शिवसेनेला आहे.

'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत याच विषयावर शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. भाजपचा वाढता आणि आक्रमक विस्तार ही शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरलीये. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेश दसऱ्याच्या दिवशी झाल्यावर सेनेच्या दसरा मेळाव्यावर खरंच परिणाम होतो का हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published: September 18, 2017, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading