मुंबई, 25 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना करण्यात आलेल्या अटक प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हणत या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्याची मागणी केली आहे. तसेच अनिल परब (Anil Parab) हे कारवाईत हस्तक्षेप करत असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
सीबीआय चौकशी व्हावी
आशिष शेलार यांनी म्हटलं, परिवहन मंत्री अनिल परब यांची व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप सर्वांनी पाहिली आहे. यातून दिसत आहे की अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.
अनिल परबांची 'ती' क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी
आशिष शेलारांनी पुढे म्हटलं, स्वातंत्र्य दिनाच अज्ञान लपवायच कस याचा हा थयथयाट आहे. हिरक महोत्सव की अमृतमहोत्सव अस स्वातंत्र्य दिन बाबत विचारणा हा देशाचा अपमान आहे. भाजप युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे, मुख्यमंत्री महोदय हा देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव आहे.
नारायण राणेंना मधुमेह असताना जेवण करुन दिलं नाही, त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ठाकरे सरकारची ही तालिबानी मानसिकता आहे. सुरुवात तुम्ही केली आणि आता शेवट आम्ही करु असा इशाराच यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
संयमी असलेल्या शरद पवारांसोबत राहूनही शिवसेनेचं संकुचित राजकारण सुरू आहे असंही यावेळी आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Ashish shelar, Narayan rane