नांदेड - वाघाळा महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

नांदेड - वाघाळा महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसाठीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलाय. नांदेड मनपासाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. नांदेडसोबतच मुंबई, पुणे आणि नागपूर महापालिकांच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महापालिकेच्या 2 जागांसाठीही यादिवशी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व मनपा निवडणुकीची मतमोजणी 12 ऑक्टोबरला होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसाठीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलाय. नांदेड मनपासाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. नांदेडसोबतच मुंबई, पुणे आणि नागपूर महापालिकांच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महापालिकेच्या 2 जागांसाठीही यादिवशी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व मनपा निवडणुकीची मतमोजणी 12 ऑक्टोबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज यासंबंधीची घोषणा केली.

नांदेड महापालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांची येत्या 31 ऑक्टोबरला मुदत संपणार आहे. म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली असून आजपासूनच त्याची आचारसंहिता लागू झालीय. नांदेड मनपात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे चव्हाणांना त्यांच्याच शहरात धूळ चारळ्यासाठी सर्वपक्षीय विरोधक पुन्हा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाणांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आ. प्रताप चिखलीकर भाजपच्या वाटेवर आहेत. असं झालं तर ही निवडणूक अशोक चव्हाणांसाठी नक्कीच सोपी असणार नाहीये.

नांदेड शहराची लोकसंख्या अंदाजे साडे पाच लाख असून एकूण मतदार संख्या 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. शहरातल्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी हे मतदान होतंय. यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव तर 15 जागा अनुसुचित प्रवर्गासाठी राखीव आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी 22 तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत. 11 ऑक्टोबरला सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच अशी मतदानाची वेळ आहे.

निवडणूक कार्यक्रम

· नामनिर्देशनपत्र -16 ते 23 सप्टेंबर 2017

· नामनिर्देशपत्रांची छाननी -25 सप्टेंबर 2017

· उमेदवारी मागे घेणे -27 सप्टेंबर 2017

· निवडणूक चिन्ह वाटप -28 सप्टेंबर 2017

· मतदान -11 ऑक्टोबर 2017

· मतमोजणी -12 ऑक्टोबर 2017

First published: September 6, 2017, 6:27 PM IST

ताज्या बातम्या