मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Best Sea Food : कोकणातील सी फूड ठाण्यात, नणंद भावजयीच्या ट्रकमध्ये मिळतात ताजे मासे, Video

Best Sea Food : कोकणातील सी फूड ठाण्यात, नणंद भावजयीच्या ट्रकमध्ये मिळतात ताजे मासे, Video

X
Thane

Thane News : या सी फूड ट्रकवर मासे खायला खवय्यांची चांगली गर्दी होत आहे.

Thane News : या सी फूड ट्रकवर मासे खायला खवय्यांची चांगली गर्दी होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नुपूर पाटील, प्रतिनिधी

    ठाणे, 23 मार्च : कोकण म्हटलं की पटकन मासे आठवतात. मासे खायचे म्हंटले की कोकणात जाव मस्त समुद्र किनाऱ्यावर फिरावं आणि माश्यांचा  आस्वाद घ्यावा असं वाटतं. पण आजच्या धावपळीत असं लवकर शक्य होत नाही. म्हणून कोकणातील सी फूड ठाण्यात खाता यावं म्हणून नणंद भावजाईने ठाण्यात आपला सी फूड ट्रक सुरु केला आहे. या सी फूड ट्रकवर मासे खायला खवय्यांची चांगली गर्दी होत आहे.

    कशी सुरुवात झाली?

    लॉकडाऊनमध्ये श्रिया जगताप व त्रिशा महाडिक दोघींचे जॉब गेले. सोबत श्रिया यांच्या भावालाही जॉब सोडावा लागला. त्यामुळे त्याने मासे विक्री सुरु केली. भाऊचा धक्का, वसई इकडून मासे आणून विक्रीसाठी सुरुवात केली. त्यावेळेस श्रिया व त्रिशाला कल्पना सुचली की आपण दोघीही इतकं छान सी फूड बनवतो नातेवाईक सुद्धा आपल्या हातचं जेवण आवडीने खातात तर मग इतर लोकांना सुद्धा आवडेल आणि म्हणूनच त्यांनी सी फूड बनवायला सुरुवात केली. लोकांनाही ते आवडू लागलं.

    कधी मिळतं सी फूड?

    श्रिया व त्रिशा दोघीही सकाळी 11 वाजल्यापासून कामाला लागतात. मासे स्वच्छ करणं, त्यांना मॅरीनेशनसाठी ठेवणं अशी सगळी कामं संपवून संध्याकाळी 7:30 पर्यंत त्या फूड ट्रक सुरु करतात. तर रात्री उशिरापर्यंत त्यांचा फूड ट्रक सुरूच असतो.

    कोणते पदार्थ मिळतात?

    कोंबडी वडे, चिकन मसाला, सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे क्रॅब मसाला असे विविध पदार्थ येथे खायला मिळतात. खराब मसाला हा आमचा स्पेशल आहे ठाण्यात कुठेही खायला मिळत नाही, असं श्रिया जगताप यांनी सांगितले.

    भोपाळची फेमस 'घमंडी लस्सी' आता मुंबईत! कमी कालावधीत झाली सुपरहिट, पाहा Video

    किती रुपयांना हे पदार्थ मिळतात?

    100 ते 300 रुपयांच्या आत या सी फूडच्या किंमती आहेत. 130 रुपयांला चिकन मिळते. तांदूळ, ज्वारीची भाकरी, चपाती सोबत हे पदार्थ खायला मिळतात. सोबत हे पदार्थ बनवताना स्वच्छता असते. येथे अनेक लोकं खायला येतात. नाशिक, वसई, पालघर, कल्याण,मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथून बरेच लोकं येथे भेट देतात. संध्याकाळी 7:30 ते 11 पर्यंत हा फूड ट्रक सुरु असतो. दर मंगळवारी हा फूड ट्रक बंद असतो.

    गूगल मॅपवरून साभार 

    पत्ता - वेलफेअर सेंटर चौक,तारांगन कॉम्प्लेक्स जवळ, समता नगर, ठाणे पश्चिम.

    संपर्क - 8850532965, +918850537585

    First published:
    top videos

      Tags: Food, Local18, Local18 food, Mumbai, Thane