Home /News /mumbai /

नाना पटोले सायकलवरून जाणार राजभवनावर, राज्यपालांची घेणार भेट!

नाना पटोले सायकलवरून जाणार राजभवनावर, राज्यपालांची घेणार भेट!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दराचा निषेध करण्यासाठी नाना पटोले आणि इतर नेते काँग्रेस नेते सायकलने राजभवनावर जाणार आहेत

    मुंबई, 14 जुलै : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ (petrol diesel price hike) वाढ झाली आहे. राज्यभरात काँग्रेसने (congress) ठिकठिकाणी आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला होता. आता याच मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) आणि इतर नेते राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या गुरुवार 15 जुलै रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढ व महागाई कमी करण्याच्या मागणीचे निवेदन नाना पटोले हे राज्यपालांना देणार आहे. पोलिसांचा 'मुळशी पॅटर्न'; कोयत्यासोबत भाईने काढले फोटो, नंतर कोठडीत जोडले हात! विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दराचा निषेध करण्यासाठी नाना पटोले आणि इतर नेते  मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्व काँग्रेस नेते सायकलने राजभवनावर जाणार आहेत. 'पंतप्रधानही गेले हॉस्पिटलमध्ये, मग तुम्ही...' विरोधकांचे साध्वी प्रज्ञांना सवाल काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे शहर अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत बैलगाडीवरून इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं करण्यात आली होती. ला. मात्र या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. आंदोलनावेळी काँग्रेस नेत्यांबरोबर काही कार्यकर्ते देखील बैलगाडीत चढले होते. मात्र बैलगाडीवर भार पडल्यानं ती कोसळली आणि बैलगाडीतील कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस नेतेही जमिनीवर कोसळले. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर भाजप (Bjp) नं काँग्रेसवर आणि भाई जगताप यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला. भाजप नेत्यांनी शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता नाना पटोले यांनी थेट आता राज्यपालांच्या भेटीला निर्णय घेऊन गुगली टाकली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Congress, Governor bhagat singh, Nana Patole, काँग्रेस, नाना पटोले, राज्यपाल

    पुढील बातम्या