काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब, लवकरच घोषणेची शक्यता

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब, लवकरच घोषणेची शक्यता

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या पदाची जबाबदारी सोडण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर राज्यात महाराष्ट्र काँग्रेसला नवीन नेतृत्वासाठी प्रक्रिया सुरू केली.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निवडीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव समोर आले आहे. काँग्रेस हायकंमाडकडून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

टीव्ही नाईन वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे प्रदेशाध्यपदावर ओबीसी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लवकरच राहुल गांधी हे दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.  नाना पटोले यांच्या पाठोपाठ राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या पदाची जबाबदारी सोडण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर राज्यात महाराष्ट्र काँग्रेसला नवीन नेतृत्वासाठी प्रक्रिया सुरू केली. थोरात यांच्यानंतर बिगर मराठा चेहरा द्यावा अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मराठवड्यातून राजीव सातव, विदर्भातील विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रभारी एच के पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी  मुंबई शहर अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची निवड झाली. भाई जगताप हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पुढील काळामध्ये प्रदेशाध्यक्ष नवीन करायचे असेल तर ओबीसी चेहरा आणावा याबाबत

अनेक नेत्यांनी सूर लगावला होता.

Published by: sachin Salve
First published: January 19, 2021, 11:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या