मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'राज्यपालांनी 12 आमदारांची यादी मंजूर केल्यावर भाजप फुटणार' नाना पटोलेंचा मोठा दावा

'राज्यपालांनी 12 आमदारांची यादी मंजूर केल्यावर भाजप फुटणार' नाना पटोलेंचा मोठा दावा

'राज्यपालांनी भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे'

'राज्यपालांनी भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे'

'राज्यपालांनी भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे'

मुंबई, 26 ऑगस्ट : मागील 8 महिन्यांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या (MLAs appointed by Governor) मुद्या अजूनही प्रलंबित आहे. आज राज्यपाल (Governor bhagat singh koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट होणार होती. पण, नियोजित कार्यक्रमांमुळे राज्यपालांनी भेट नाकारल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी दिली आहे. तसंच, 'जर राज्यपालांनी आमदारांची यादी मंजूर केली तर भाजप फुटणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

आज राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते.  पण, संध्याकाळपर्यंत नियोजित कार्यक्रमांमुळे ही भेट होऊ शकली नाही. तर, दुसरीकडे, नाना पटोले यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ल्याचा पहिला VIDEO आला समोर; किमान 10 ठार?

'हायकोर्टाने  स्पष्ट केलं आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेले. त्यानंतर आता भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार होते. हे बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. पण, राजभवनाकडून त्यांनी भेटीसाठी वेळच दिला नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

राज्यपाल 4 दिवस दिल्ली आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर

दरम्यान, मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. पण राज्यपाल आता चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेट दिल्लीत घेण्याची शक्यता आहे. दिल्ली दौरानंतर ते उत्तराखंड येथेही जाणार आहे. त्यामुळे आता  महाविकास आघाडीच्या  नेत्यांना चार दिवसानंतर भेट आता देणार आहे.

ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठी संधी; या योजनेतून सुरु करु शकता व्यवसाय

त्याआधी, 'आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती, त्यावेळी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल यांना फोन लावला. तेंव्हा राज्यपाल म्हणाले 6.30 वाजेच्या सुमारास या. पण, माध्यमांमध्ये बैठक रद्द झाल्याचे वृत्त आल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आली.  त्यामुळे, अधिकृत भेटीच वेळ ठरवण्यासाठी मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले.  राज्यपालांशी चर्चा करून राजभवन येथून नार्वेकर बाहेर पडले आहे.

First published:
top videos

    Tags: Nana Patole