भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

राज्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान झालेले शेतकरी मृत्यू हे सरकारी उदासीनतेने घडवून आणलेले हत्याकांड आहे असा आरोप करत खासदार नाना पटोले यांनी केला आहे. तसंच या प्रकरणात संसदीय समिती स्थापन करण्याची मागणीही केली आहे.

  • Share this:

मुंबई,27 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर उघडपणे टीका करणारे भाजपचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार नाना पटोले आज दुपारी साडेचार वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही खासदार नाना पटोले लवकरच भेट घेऊन शेतकरी प्रश्नावर काँग्रेसच्या खासदारांचा पाठिंबा मागणार आहेत.

राज्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान झालेले शेतकरी मृत्यू हे सरकारी उदासीनतेने घडवून आणलेले हत्याकांड आहे असा आरोप करत खासदार नाना पटोले यांनी केला आहे. तसंच या प्रकरणात संसदीय समिती स्थापन करण्याची मागणीही केली आहे. या मागणीसाठी शिवसेना खासदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी नाना पटोले उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. लवकरच नाना पटोले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनाही भेटून काँग्रसचा पाठिंबा मागणार आहेत.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्ण हजारे यांनाही नाना पटोले सात नोव्हेंबरला भेटून शेतकरी प्रश्नावर त्यांचा पाठिंबा मागणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भाजपचे खासदार नाना पटोले येत्या 7 नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एकत्र येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍न धसास लावण्यासाठी आता अण्णा हजारे थेट आंदोलनाच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे नाना पटोलेंची मागणी पूर्ण होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...