मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा आजच राजीनामा देण्याची शक्यता

BREAKING : नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा आजच राजीनामा देण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचले आहे.

मुंबई, 04 फेब्रुवारी : काँग्रेसमध्ये (Congress) हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाची निवड अखेर निश्चित झाली आहे. त्यामुळे नाना पटोले आजच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे सह्याद्री गेस्ट हाऊस येथे पोहोचले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांकडे आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याची माहिती मिळत आहे. कॅबिनेट बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाकी सर्व मंत्र्यांची ते भेट घेणार आहे.

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड निश्चित समजली जात आहे. त्यामुळे त्यांना आता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे नाना पटोले हे आजच राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पद सोडण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे  प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव चर्चेत आले आहे. जर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तर भविष्यात विधानसभा अध्यक्ष देखील बदलावे लागतील. त्या अनुषंगाने काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांची नावं आता विधानसभा अध्यक्षपदासाठी प्राथमिक चर्चेला समोर येत आहेत. नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून  निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

First published: