मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममतादीदींना नाना पटोलेंनी दिले जशास तसे उत्तर, म्हणाले...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममतादीदींना नाना पटोलेंनी दिले जशास तसे उत्तर, म्हणाले...

'एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे'

'एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे'

'एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे'

मुंबई, 01 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे (congress) नेते चांगलेच संतापले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे' असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी लगावला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपविरोधात लढण्यासाठी नवीन पर्याय दिला पाहिजे, असं विधान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.

IPL 2022 : 24 तासांमध्ये पंजाबला दुसरा धक्का, राहुलनंतर आणखी एकाने सोडली साथ

तसंच, 'सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात लढत आहे' असंही पटोले म्हणाले.

कुछ भी! म्हणे मेलेल्या बॉयफ्रेंडनं केलं प्रपोज, लवकरच आत्म्याशी होणार शुभमंगल

'भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असंही पटोले म्हणाले.

First published:
top videos