मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाना पटोले भडकले

मोठी बातमी, शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाना पटोले भडकले

   'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो'

'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो'

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

मुंबई, 09 मार्च : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्याच्या मुद्यावरून काँग्रेस (Congress) आग्रही भूमिका मांडत आहे. आज काँग्रेस नेत्यांची विधानभवनात (Vidhanbhavan) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) भूमिकेवर चांगलेच संतापल्याचे वृत्त आहे.

विधानभवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात, उर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर यांच्यासह  इतर आमदार उपस्थितीत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच भडकले होते.

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षावर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोनेखरेदीची सुवर्णसंधी! आतापर्यंत 12000 रुपयांनी उतरले दर, इथे तपासा आजचा भाव

विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेल्या विरोधावरून पटोले कमालीचे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेसने केली होती. पण, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नसल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

अध्यक्ष निवडीची प्रक्रियेसाठी किमान तीन दिवस लागतात. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते.

चालत्या कारमध्ये 12 जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार, घटनेचा Video Viral

दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होत असते. आज आणि उद्या असे दोनच दिवस अधिवेशनाचे राहिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणुक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.

अधिवेशन आज 'या' मुद्द्यांवर गाजणार?

विधानसभेचा आजचा दिवस गाजणार आहे विरोधी पक्ष नेते यांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव यावर. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील शेतकरी दयनीय अवस्था, सरकारची फसवी कर्जमाफी अवकाळी पाऊस पीकनुकसान आणि सरकारने जाहीर केलेली अपुरी मदत यावर अंतिम आठवडा आहे. देवेंद्र फडणवीस हे सरकारची पोलखोल करतील, तसच २९२ अन्वये कायदा सुव्यवस्था, मुंबईसह शहरी भागात रखडलेले मेट्रो प्रकल्प यावर चर्चा आज विधिमंडळात होणे अपेक्षित आहे.

Ulhasnagar News : मास्क लावून चोरांनी फोडले दुकान, 1 लाखांची रोकड लंपास

अर्थसंकल्प वित्त मंत्री अजित पवार यांनी मांडला त्यावर आज विधिमंडळात चर्चा देखील होणार आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधक तर तोंडसुख घेतीलच त्याच वेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस पक्षाने गॅस डिझेल दरवाढ यावर सवलत न दिल्याने नाराजी व्यक्त केली, विधानसभेत काँग्रेस अर्थसंकल्प मंजुरी देताना चर्चा करताना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Devendra Fadnavis, Shivsena