मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'...म्हणून थोरातांना महसूल खातं दिलं', वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त करताच नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून थोरातांना महसूल खातं दिलं', वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त करताच नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

Nana Patole on Vijay Wadettiwar statement: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलेल्या खंतवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Sunil Desale

तुषार रूपनवर, प्रतिनिधी

मुंबई, 27 जून: ओबीसी परिषदेत भाष्य करताना राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. पंकजा ताई तुम्ही ग्रामविकास मंत्री होता मी विरोधी पक्ष होतो. त्यामुळे वाटले महसूल खाते (Revenue Ministry) मिळेल पण मिळाले ओबीसी खाते मिळाले. ओबीसी असल्याने मदत आणि पुर्नवसन खातं मला मिळालं. मला वाटलं होतं महसूल खाते मिळेल. ओबीसी खातं दिलं तेव्हा चपरासी सुद्धा नव्हता. मंत्रालय स्टाफ नाही, निधी नाहीये, अजित पवार (Ajit Pawar)-धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याकडे वारंवार फॉलोअप घ्यावा लागला. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खाते चालवतोय अशी खदखद त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.

नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर यापुढील काळात अन्याय होणार नाही यांची आम्ही काळजी घेऊ. काँग्रेस पक्षात कोणतीही धुसफूस नाहीये. वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.

प्रविण दरेकरांची टीका

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवताच भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं, काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला आहे. त्यामुळेच आज विजय वडेट्टीवार यांनी मनातील खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते छगन भुजबळ मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना 22व्या क्रमांकाचे खाते देण्यात आले.

मला रोज धमक्यांचे फोन

ओबीसी परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटलं पाहिजे आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतराला हवे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी बोलतो, समाजाच्या बाजू मांडतो मात्र मला दररोज धमक्यांचे फोन येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून धमकी देणारे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Nana Patole, Vijay wadettiwar