मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं', नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

'70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं', नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका


'कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं'

'कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं'

'कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं'

मुंबई, 30 मे: मोदी सरकारला (7 years of NDA) सात वर्ष पूर्ण झाली आहे. एकीकडे भाजप आंनदोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे काँग्रेसने राज्यभरात निदर्शनं सुरू केली आहे. '7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे' अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

'कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशात कोरोनाची परिस्थितीत बिकट झाली, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

कोरोनामुळे तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीसमोर भाडोत्री मातृत्वाचा पर्याय

तसंच, 7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षांमध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे त्यामुळे आम्ही निषेध आंदोलन करतोय. इंधन दरवाढीवर आम्हाला बोलण्या ऐवजी तुम्ही वाढीव कर केंद्रातून कमी करा, 22 टक्के कर का घेतला जातोय, असा थेट सवाल पटोले यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना विचारला.

'आज देशात लस मिळत नाही आहे, पण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लस दिली जात आहे, मोदी सरकारचे हे धोरणंच आहे सुटा बुटातील हे सरकार आहे, यांना फक्त श्रीमंत लोकांची काळजी आहे का? असा सवालही पटोले यांनी उपस्थितीत केला.

VIDEO : शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला, घरगुती वादात भाजप MLAची उडी

रेमडीसीवीर इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचे साईड इफेक्ट दिसून आले ब्लॅक फंगल्स मोठ्या प्रमाणात वाढत गेला आहे.  फॅक्टरीतील ऑक्सीजन वापरल्यामुळे ब्लॅक, पांढरा, पिवळा फंगल्स वाढत आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

'राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा दमण येथून भाजपने रेमडेसीवीर इंजेक्शन आणण्याची तयारी केली होती. जेव्हा हा साठा जेव्हा पकडला होता तेव्हा दोन्ही विरोधी पक्ष नेते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, असं म्हणत फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

First published:

Tags: PM narendra modi