Home /News /mumbai /

"भाजप खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला" नाना पटोलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

"भाजप खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला" नाना पटोलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Nana Patole Phone Tapping: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे की, त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता.

मुंबई, 14 मे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दावा केला आहे की, भाजप खासदार असताना त्यांचा फोन टॅप (Phone was tapped when I was BJP MP said Nana Patole) करण्यात आला होता. इतकेच नाही तर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचेही फोन टॅप (Shiv Sena leaders phone tapped) करण्यात आल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले नाना पटोले? अमजद खानच्या नावाने माझ्या फोन 2016-2017 मध्ये टॅपिंगसाठी टाकण्यात आला होता. माझा फोन टॅप करण्यासाठी शासनाकडून 2016-17 ला परवानगी घेण्यात आली होती. मला असंही कळलं आहे की, काही आयएएस, आयपीएस अधिकारी, राष्ट्रवादीचे मोठे नेते, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचा फोन टॅप त्या काळात करण्यात आले होते. वाचा: Maratha Reservation: "आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, मंत्र्यांना फिरू देणार नाही, मोर्चा काढणार"-विनायक मेटे म्हणून आम्ही मागणी करतो की, शासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. सर्वांनाच व्यक्ती स्वातंत्र्य असतं. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर हे होता कामा नये. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची भूमिका आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कोणाचा फोन टॅप करता येतो? प्रशासन, सरकारच्या परवानगीशिवाय कुणाचाही फोन टॅप करता येत नाही. राज्य सरकारकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी देण्याची कारणे आहेत. यामध्ये देशाची एकता आणि अखंडता, सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी, परकीय देशासोबतचे मैत्रीचे संबंध, जनतेमध्ये शांतता राखण्यासाठी, एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास प्रतिबंध करण्यासाठी (उदा. खंडणी) यांचा समावेश आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Congress, Nana Patole

पुढील बातम्या