तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांची माफी मागावी, पाठवली कायदेशीर नोटीस

तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांची माफी मागावी, पाठवली कायदेशीर नोटीस

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवलीय.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवलीय. या नोटिसीत तनुश्रीनं नानावर केलेले आरोप खोटे आहेत आणि तिनं नानांची क्षमा मागावी असं म्हटलंय.

नानाचे वकील राजेंद्र शिरोडकर म्हणाले, 'तनुश्रीनं चुकीचे आरोप केलेत. त्यामुळे त्या नोटीसीत तिला माफी मागायला सांगितलीय.'

2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला, असा दावा तनुश्री दत्तानं केला होता. यावर ते म्हणाले, 'आम्ही दोघं सेटवर होतो आणि त्यावेळी आमच्या समोर 200 जण होते. मी काय बोलू यावर?'

तनुश्री दत्ता म्हणाली होती, 'नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होतं.'

'मी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते पण माझी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. उलट माझ्याच विरोधात उलटी तक्रार दाखल करण्यात आली होती असंही तिने सांगितलं होतं.

नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातल्या काँट्रोव्हर्सीनंतर बाॅलिवूडचे मोठे चेहरे समोर आलेत. कंगना राणावत, रवीना टंडन, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा ही मंडळी तनुश्री दत्ताच्या बाजूनं उभे राहिलेत. पण अामिर खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांना मीडियानं याबद्दल विचारलं असता त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही.

कृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 03:39 PM IST

ताज्या बातम्या