मुंबई 07 जानेवारी : अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo आंदोलनादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केला होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले होते. तनुश्रीने हे प्रकरण कोर्टात नेलं असून त्यावर सुनावणीही सुरू आहे. तनुश्रीने आज आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन नाना पाटेकरांवर पुन्हा आरोप केलेत. नाना हा दुसरा आसाराम बापू असल्याचा गंभीर आरोप तीने केला. तनुश्रीच्या आरोपांमुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
तनुश्रीने आपल्या वकिलांच्या उपस्थितीत नाना पाटेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत. नामा फाऊंडेशनच्या नावावर विदेशातून देणग्या मिळाल्या आहेत. त्याचाही गैरवापर होत असल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केलाय. या आरोपांवर नाना पाटेकर यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. नानांनी खुलासा केल्यावर त्यांचीही बाजू देण्यात समोर येणार आहे.
13 जून 2019लाच नाना पाटेकर यांना एका प्रकरणात क्लिन चीट दिली होती. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी हॉर्न ओके प्लिजच्या सेटवर गैरवर्तन केल्याप्रकरणी नाना पाटेकर यांना ही क्लिन चिट मिळाली होती. या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्तानं ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा अहवाल अंधेरी न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र पोलिसांना नाना पाटेवर यांच्या विरोधात कोणताही ठेस पुरावा न सापल्यानं नाना पाटेकर यांना आता दिलासा मिळाला होता.
प्रियांकाचा VIDEO VIRAL, KISS करताना निकच्या ओठांना लागली लिपस्टिक आणि...
2019 मध्ये तनुश्री दत्तानं MeToo मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लिज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धातीनं स्पर्श केल्याचं तनुश्रीनं म्हटलं होतं. या सिनेमात आयटम साँग तनुश्री करत होती मात्र तिने या गाण्यातील काही स्टेपवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सिनेमाच्या सेटवर प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर तनुश्रीने या सिनेमातून माघार घेतली आणि ती परदेशात निघून गेली.
Birthday Special : बिपाशा बासूचे 'हे' 30 दुर्मिळ फोटो, तुम्ही कधीच पाहिले नसतील
मात्र भारतात परतल्यावर तिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र पोलिस तपासात हे सर्व आरोप कमकुवत असल्याचं तसेच नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं दिसून आलं त्यामुळे नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला होता.तनुश्री दत्तानं MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर हळूहळू बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नाव या मोहिमेत समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.