मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"ए दादा आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?" चिमुकल्यांचे शब्द ऐकताच नालासोपाऱ्यातील तरुणाने थेट घडवली Helicopter सफर

"ए दादा आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?" चिमुकल्यांचे शब्द ऐकताच नालासोपाऱ्यातील तरुणाने थेट घडवली Helicopter सफर

प्रातिनिधिक फोटो (Image Reuters)

प्रातिनिधिक फोटो (Image Reuters)

Helicopter ride for poor childrens: दोन गरीब चिमुकल्यांची हेलिकॉप्टरमध्ये सफर करण्याची इच्छा नालासोपाऱ्यातील तरुणाने पूर्ण केली.

मुंबई, 17 ऑक्टोबर : विमानात किंवा हेलिकॉप्टरमधून प्रवास (helicopter ride) करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, गरीब आणि ज्यांची आर्थिक स्थिती नसते त्यांच्यासाठी हे स्वप्नच असतं. असंच स्वप्न फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यांचं होतं आणि ते पूर्ण केलं आहे नालासोपाऱ्यातील (Nalasopara) तरुणाने. या तरुणाचे नाव यश माने (Yash Mane) असं आहे. यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने या दोन्ही मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून आणली आहे.

झालं असं की, रवी वेलपट्टी आणि अंजली मोडेम ही दोन मुलं नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात फुटपाथवर राहतात. आपल्या हातात मिळेत ले काम अन्यथा भीक मागून आपला उदरनिर्वाह ते करत असतात. एके दिवशी या दोघांचे संभाषण नालासोपाऱ्यातील यश माने याने ऐकलं आणि तो भारावून गेला. ए दादा आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये कधी बसायला मिळणार, आम्हाला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार? असा प्रश्न त्यांनी केला. यावर यश माने या तरुणाने त्यांना थेट हेलिकॉप्टर सफर घडवण्याचं ठरवलं.

वाचा : विसर्जन मिरवणुकीत शिरली भरधाव कार; दोघांना चिरडले, भीषण अपघाताचा LIVE VIDEO

एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या यश माने या तरुणाने रवी वेलपट्टी आणि अंजली मोडेम या दोन्ही तरुणांचं स्वप्न पुर्ण करण्याचं ठरवलं. त्यानंतर या दोन्ही तरुमांना 14 ऑक्टोबर रोजी हेलिकॉप्टर सफर घडवली. दुपारच्या सुमारास मुंबईच्या विलेपार्ले येथून मुंबई, ठाणे आणि वसई-विरार या परिसरातली हवाई सफऱ घडवून आणली. हवाई सफर करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याने या दोन्ही तरुणांना प्रचंड आनंद झाला.

यश माने या तरुणाने आपल्या स्वखर्टाने दोन्ही तरुणांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ही पहिली वेळ नाहीये ज्यावेळी यश माने याने अशा प्रकारे दोन्ही तरुणांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. यापूर्वी यश माने याने गरीब मुलांना आपल्या स्वत:च्या खर्चाने तरुणांना हेलिकॉप्टर सफर घडवून आणली आहे. यश माने या तरुणाचे कौतुक करावे तेवढे तोडेच आहे. दरवर्षी यश अशाच प्रकारे गरीब मुलांना हेलिकॉप्टर सफर घडवून त्यांचं स्वप्न पूर्ण करत असतो.

हेलिकॉप्टर सफर घडवून आणल्यावर या दोन्ही मुलांनी प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला. हेलिकॉप्टर प्रवास करुन आम्हाला खूपच चांगले वाटले, आम्ही हेलिकॉप्टर आकाशात असताना पाणी, डोंगर आणि बरंच काही पाहिलं अशी प्रतिक्रिया या चिमुकल्यांनी दिली.

First published:

Tags: Helicopter, Mumbai