मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गाडी धडकणार इतक्यात... थोडक्यात बचावला चिमुरडा, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

गाडी धडकणार इतक्यात... थोडक्यात बचावला चिमुरडा, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', अशी परिस्थिती अनेकदा पाहायला मिळते. याच म्हणीची प्रचिती नालासोपारा (Nalasopara Accident) याठिकाणी पाहायला मिळाली आहे.

नालासोपारा, 19 मार्च: सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा असे काही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असताता की जे काळजाचा ठोका चुकवणारे असतात. अपघात किंवा प्राण्यांचे काही व्हिडीओ जे पाहून धडधड वाढायला लागते. असे देखील काही व्हिडीओ व्हायरल होता, ज्यामध्ये काही माणसं थोडक्यात बचावतात. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', अशी परिस्थिती अनेकदा पाहायला मिळते. याच म्हणीची प्रचिती नालासोपारा (Nalasopara Accident) याठिकाणी पाहायला मिळाली आहे. जो व्हिडीओ समोर येत आहे ज्यामध्ये एक चिमुरडा थोडक्यात बचावला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील ही घटना आहे. याठिकाणी असणाऱ्या पाटणकर पार्कमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हायरल होणारा व्हिडीओ स्तब्ध करणारा आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की एक इसम या रोडवरून चालत जातो आहे आणि त्याच्यामागून एक चिमुरडा देखील चालत आहे. एका इमारतीच्या गेटजवळून ते पुढे जात आहेत. तेवढ्यात एक महिला त्या इमारतीच्या गेटमधून भरधाव वेगाने बाहेर येते. मुलगा पुढे जातो आणि त्याच क्षणाला ती महिला त्याठिकाणी येऊन आदळते.

त्या महिलेचं स्कुटरवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. ही महिला भींतीवर आदळल्याने ती जखमी झाली आहे, तिच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही महिला जी गाडी चालवत होती त्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Accident, Live video, Maharashtra, Mumbai, Nalasopara, Shocking