'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी

'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी

अबू आझमी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सनातन संस्था आणि अभिनव भारतवर बंदीची मागणी केलीये.

  • Share this:

मुंबई, 20 आॅगस्ट : नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरात स्फोटकं सापडली. या प्रकरणातील आरोपींना बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवून आणायचा होता असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केला. तसंच नवज्योत सिंग सिध्दू यांच्या पाकिस्तान दौऱ्याला भाजप विरोध करतोय तर भाजपने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही पाकिस्तानला गेले होते. त्याचाही भाजपने निषेध करावा असा टोलाही आझमींनी लगावला.

अबू आझमी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सनातन संस्था आणि अभिनव भारतवर बंदीची मागणी केलीये. बकरी ईदच्या दिवशी सनातनशी संबंधीत या आरोपींना घातपात घडवून आण्याचा होता त्यामुळे फडणवीस सरकारने बकरी ईदच्या दिवशी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी अबू आझमींनी केली.

मालेगाव, गुजरातमधील मोडासा आणि मक्का मस्जिद या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या उत्सवाच्या दिवशी याच संस्थेच्या लोकांनी स्फोट घडवून आणले. आता बकरी ईदच्या दिवशीही या लोकांना स्फोट घडवून आणण्याचा इरादा होता असा आरोपही अबू आझमींनी केला.

एटीएसने पकडलेल्या या आरोपींवर मोक्का आणि यूएपीएअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही आझमींनी केली. तसंच ज्या सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी नालासोपारा प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही आझमींनी केली.

नवज्योत सिंग सिध्दूंची पाठराखण

त्यानंतर अबू आझमी यांनी काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पाठराखण केली. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाणे यात काहीही वावगं नाही. भाजपचे नेते सिध्दू यांच्यावर टीका करत आहे. पण भाजपने हे विसरू नये की, माजी दिवगंत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भाजपने अटलजींविरोधात आंदोलन करावे अशी गंभीर टीका आझमींनी केली.

तसंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. त्याविरोधातही भाजपने आंदोलन करावे असा टोलाही आझमींनी लगावला.

 

कॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 05:10 PM IST

ताज्या बातम्या