वेळ, ठिकाण आणि कशी करणार आत्महत्या याचं चित्र काढून घेतला गळफास

वेळ, ठिकाण आणि कशी करणार आत्महत्या याचं चित्र काढून घेतला गळफास

कशाप्रकारे आत्महत्या करणार हे सुद्धा लिहून ठेवलं होतं. याची चित्रंही त्यानं वहीत काढून ठेवली होती.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : नालासोपारा इथं एका 13 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाने आपलं जीवन संपवण्यापूर्वी आत्महत्येची वेळ, ठिकाणी आणि पद्धत हे सगलं वहीमध्ये लिहून ठेवलं होतं.

नालासोपारा इथल्या रश्मी रेसिडेंसीमध्ये राहणाऱ्या हजैफा नागोरी असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. इमारतीच्या गार्डनमधल्या झोपाळ्याला गळफास घेऊन या मुलानं आत्महत्या केली. हजैफा हा वसंत नगरी इथल्या सेठ विद्यामंदिरातील 8 वीत शिकत होता.

हजैफा याने आपल्या आत्महत्येची संपूर्ण योजना बनवली होती. त्यानं आत्महत्येचं ठिकाण, वेळ या सर्वाची वहीत नोंद केली होती. कशाप्रकारे आत्महत्या करणार हे सुद्धा लिहून ठेवलं होतं. याची चित्रंही त्यानं वहीत काढून ठेवली होती. आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हजैफा नागोरी हा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचा. त्याचाच परिणाम होऊन हजैफाने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हजैफाच्या आत्महत्येने इंटरनेटचे दुष्परिणाम पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

या सगळ्या प्रकारामुळं मुलांचं मानसिक स्वास्थ्य, इंटरनेटचे दुष्परिणाम यावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. मैदानी खेळ सोडून मुलं आभासी विश्वात रमत आहेत. त्याचाच परिणाम मोठ्या प्रमाणात लहानग्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.


VIDEO : पुण्यात मनसेचा तुफान राडा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 12:05 PM IST

ताज्या बातम्या