Home /News /mumbai /

नायर रुग्णालय प्रकरणी संबंधित डॉक्टर निलंबित, महापौरांकडून कारवाईचा बडगा

नायर रुग्णालय प्रकरणी संबंधित डॉक्टर निलंबित, महापौरांकडून कारवाईचा बडगा

मुंबईच्या नायर रुग्णालयातील (Mumbai Nair Hospital) एक व्हिडीओ काल (30 नोव्हेंबर) दिवसभर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता.

    मुंबई, 02 डिसेंबर: मुंबईच्या नायर रुग्णालयातील (Mumbai Nair Hospital) एक व्हिडीओ मंगळवारी (30 नोव्हेंबर) दिवसभर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. संबंधित व्हिडीओत एक चार महिन्यांचं बाळ जिवाच्या आकांताने रडताना दिसत होतं. त्या बाळाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे त्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. तसंच या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC mayor Kishori Pednekar) यांनी या प्रकरणी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरांना आम्ही निलंबित केलं असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. एफआयआर नोंद करण्याबाबत सुद्धा प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं आहे. हेही वाचा- कामाच्या बदल्यात दिली लाजिरवाणी ऑफर, 'सहकुटुंब सहपरिवार'तील अभिनेत्रीची तक्रार निर्णय तर घेतलाच आहे मला स्वत: त्या डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचे आहे कारवाई निश्चित होणार असल्याचं महापौर म्हणाल्या होत्या. त्यानंतर मी स्वत: भेट घेऊन आहे सगळी माहिती समोरासमोर घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. नेमकं प्रकरण काय? वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये काल सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला (वय वय 25) आणि एक पुरुष (वय 27) असे चौघे जण भाजले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिकेचं अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण नायर रुग्णालयात या जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या संबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील डॉक्टर आणि पारिचारिकांची असंवेदनशीलता पाहून काळीज पळवटून जाईल. इतकं असंवेदनशील असूच नये' या प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "मला उशिरा हे प्रकरण कळलं. इतकं असंवेदनशील असूच नये. मला याबद्दल काहीच बोलता येत नाहीय. सिलेंडरचा स्फोट होऊन बाळ होरपळलं तर त्याच्यावर त्वरित उपचार होणं अपेक्षित होतं. सिलेंडरच्या स्फोटानंतर बाळावर करण्यात आलेली उपचारपद्धती ती मी स्वत: जावून बघणार आहे. या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे येतात त्यावेळी डॉक्टर कसे वागतात ते सगळं मलाही चेक करावं लागेल", अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. हेही वाचा- मोठी बातमी: स्टार टेनिस खेळाडू महिनाभरापासून गायब, WTA नं केल्या सर्व स्पर्धा रद्द  "संबंधित व्हिडीओत डॉक्टर, नर्सचा स्टाफ अतिशय रिलॅक्स मोडमध्ये बघायला मिळत आहे. तो व्हिडीओ नेमका कधीचा आहे ते देखील बघावं लागेल. पण अशी असंवदेनशील गोष्ट घडली असेल तर जबाबदारांवर कारवाई व्हायलाच हवी. कारण मी सुद्धा एक आई आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. रुग्णालयात गेल्यावर मला बघताच क्षणी कळेल. मी पुढच्या एक तासात रुग्णालयात पोहोचणार आहे. या प्रकरणात जर हलगर्जीपणा दिसला तर तो खपवून घेतला जाणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपण डॉक्टरांना देव मानतो. पण अशी अक्षम्य चूक चालणार नाही. असंवेदनशीलता कुठेच असता कामा नये. सगळ्या गोष्टी तपासणार, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नेमकं काय होतं? संबंधित घटनेबाबत जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस दिसत आहेत. व्हिडीओ बनवणारा व्यक्ती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती भाजलेला आहे. तो वेदनांनी प्रचंड व्हिव्हळताना दिसतोय. त्याचबरोबर एक चार महिन्यांचं बाळ खूप जिवांच्या आकांताने रडतंय. या बाळाला देखील भाजलेलं दिसतंय. पण डॉक्टर, नर्सेस कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. संबंधित व्हिडीओ हा खरंच थरकाप उडवणारा असाच आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने रुग्णांना तासाभरापासून तसंच ताटकळत ठेवलं असल्याचा आरोप केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kishori pedanekar

    पुढील बातम्या