नायगावचा रेल रोको स्थगित; विरार चर्चगेट रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू

नायगावचा रेल रोको स्थगित; विरार चर्चगेट रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू

नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला. दोन गाड्या रद्द केल्या म्हणून प्रवाशी संतप्त झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी उत्फूर्त रेलरोको केला.

  • Share this:

नायगाव,07 ऑक्टोबर: नायगावमध्ये दोन रेल्वे रद्द केल्या म्हणून करण्यात आलेल्या रेल रोकोला स्थगिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने या रेलरोकोला स्थगिती देण्यात आली आहे.

नायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला. दोन गाड्या रद्द केल्या म्हणून प्रवाशी संतप्त झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी उत्फूर्त रेलरोको केला. या रेलरोकोमुळे विरार ते बोरिवली दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती.

पण नायगाव रेल्वे आंदोलन जीआरपी पोलिसांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले आहे.आता रेल्वे चर्चगेट कडे सोडण्यात आल्या आहेत. रखरखाटासाठी गाड्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार रद्द करण्यात आल्या होत्या असं व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.

First published: October 7, 2017, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading