Home /News /mumbai /

मंगळ ग्रहावर दिसलं असं काही की नासाही झाली हैराण, तुम्हीच पाहा हा PHOTO

मंगळ ग्रहावर दिसलं असं काही की नासाही झाली हैराण, तुम्हीच पाहा हा PHOTO

नासाने काही दिवसांपूर्वी एक रोबोट पाठवला होता. याचं नाव होतं ऑर्बिटर. हा रोबोट सतत मंगळग्रहावरील फोटो कॅमेऱ्यात कैद करत होता

    मुंबई, 05 मार्च : अमेरिकेची अंतराळ संशोधन मोहिम संस्था नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन नासा (NASA) ने मंगळ ग्रहावरील 2011 मध्ये घेतलेला फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये एक रहस्यमयी खड्डा दिसत आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रांचं म्हणणं आहे की, या खड्ड्यामुळे मंगळ ग्रहावर जीवन सृष्टी असल्याचा काही पुरावा हाती लागू शकतो. जवळपास 35 मीटर रूंद असलेल्या खड्ड्याभोवती काही गुफा असल्याचं समोर आलं आहे. या फोटोवर शास्त्रांनी अजून खोलात जाऊन संशोधन केलं नाही. नासाने काही दिवसांपूर्वी एक रोबोट पाठवला होता. याचं नाव होतं ऑर्बिटर. हा रोबोट सतत मंगळग्रहावरील फोटो कॅमेऱ्यात कैद करत होता आणि तो नासाला पाठवत होता. हा फोटो सुद्धा ऑर्बिटरने पाठवला आहे. जेव्हा या खड्डाबद्दल माहिती मिळाली तेव्हा नासाच्या शास्त्रांनी  असा अंदाज व्यक्त केला ही गुफा जवळपास 20 मीटर खोल आहे. नासाने आपल्या एका ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे की, या गोलाकार खड्ड्याभोवती अनेक सुरक्षित गुफा असल्याचं कळतंय. याची लांबी 35 मीटर आणि खोली 20 मीटर पर्यंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शास्त्र आणि अभ्यासक याबद्दल सखोल अभ्यास करत असून आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल, शोधला दोन सूर्य असलेला ग्रह! दरम्यान, नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थानं मोठा शोध लावलाय. त्यानं चक्क एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, या ग्रहात दोन सूर्य आहे. या नव्या ग्रहाचं  नाव T0I 1388B ठेवण्यात आलंय. या नव्या ग्रहाचा आकार नेप्च्युन आणि सॅटर्न ग्रहा एवढा असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. नव्या ग्रहाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो. नासाच्या ट्रान्सिटिंग एक्सोप्लेनेट सर्वे सॅटेलाईट मिशनला अनेक ग्रहांचा शोध लावण्याचं श्रेय देण्यात येते.आता या यादीत आणखी एका ग्रहाची भर पडली आहे. शोधण्यात आलेला ग्रह हा सौर मंडळापासून खूप दूर आहे. ह्या ग्रहाचा शोध लावणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव वुल्फा कुकीयर असं आहे. कसा लागला नव्या ग्रहाचा शोध? नासातील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून वुल्फ कुकीर काही दिवसांपासून काम करत होता. इंटर्नशिपच्या तिसऱ्याचं दिवशी काम करत असताना T0I 1338B या सिस्टिममधून संदेश मिळाला. या संदेशावरून मी त्याचा अभ्यास केला मला सुरुवातील वाटलं हा एक स्थिर ग्रह आहे. पण तो एक ग्रह निघाला. त्या ग्रहात दोन सूर्य असल्याचं समोर आलं. वुल्फ याला पिक्टर नावाच्या सौरमंडळामध्ये दोन तारे परिक्रमा करताना दिसले. हे तारे पृथ्वीपासून सुमारे 1,300 प्रकाश वर्ष दूर आहे. यातील एक तारा सुर्यापेक्षा 15 टक्के मोठा आहे. तर दुसरा तारा हा खूप लहान आहे. काय आहे TESS मिशन? TESS मिशन 2018 च्या एप्रिल महिन्यात SPACEX फॉल्कन 9 द्वारे लाँच करण्यात आलं होतं.  SpaceX उपग्रह सरळ 27 दिवस एक एकल स्थानाचं निरीक्षण करते आणि प्रत्येक 30 मिनिटांमध्ये फोटो काढते. यामुळं वैज्ञानिकांना ताऱ्यांमधील प्रकाश आणि चढ उताराची माहिती मिळण्यास मदत होते. या ग्रहांना गोचर म्हणूनही ओळखलं जातं.  या मिशनच्या माध्यमातून नासातील वैज्ञानिकांना नव्या ग्रह आणि ताऱ्यांचा शोध घेण्यास मदत होते. या मिशनच्या माध्यमातूनच या दोन सूर्य असलेल्या नव्या ग्रहाचा शोध लागलाय. या नव्या ग्रहाचा अभ्यास अजूनही सूरू आहे. अभ्यासातून आणखी काय नवी माहिती समोर येते हे आता पाहावं लागणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या