माझ्या बायकोचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त, देवेंद्र फडणवीसांचा असाही खुलासा

माझ्या बायकोचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त, देवेंद्र फडणवीसांचा असाही खुलासा

'देवेंद्र फडणवीस उत्तम लेखक आहे. राजकारण सोडून लेखक झाले तर आम्हाला सुगीचे दिवस येतील'

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

'अर्थसंकल्प हा सर्व सामान्य माणसाला सहज शब्दात समजावा यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अवघ्या 40 मिनिटामध्ये वाचता येईल. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरात बायकोचा पगार किती आपला किती पगार आहे, याच्यावर घरचं बजेट तयार करतो. माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो', अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. मला वाटलं नव्हतं, या विषयावर बोलण्याची माझ्यावर ही वेळ येईल पण ही वेळ माझ्यावर देवेंद्र फडणवीस तुमच्यामुळेच आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. तसंच, 'तुम्ही असेच आमच्या अर्थसंकल्पांवर पुस्तकं लिहीत राहा', अशा मिश्किल शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या.

अजित पवारांची फडणवीसांना कोपरखळी

या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. 'देवेंद्र फडणवीस उत्तम लेखक आहे. राजकारण सोडून लेखक झाले तर आम्हाला सुगीचे दिवस येतील', असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला.  'आता फडणवीस यांनी दिल्लीला जावं  ते दिल्लीला गेले तर सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल', असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

तसंच बजेट सादर करत असतांना विरोधी बाकावरील सदस्यांनी ते शांतपणे ऐकून घेणं फार महत्वाचं असतं. हेच सांगत असताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला आणि मुनगंट्टीवार यांना टोला हाणला.

First published: March 4, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading