Home /News /mumbai /

माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली, मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर

माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली, मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर

श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला.

श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला.

श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला.

    मुंबई, 04 जुलै: श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला. माझ्या आयुष्यात दुखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. त्यावेळेस मला आधार दिला, आनंद दिघे साहेबांनी आधार दिला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde speech) यांना अश्रू अनावर झाले. शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर झालेले आरोप आणि टिकेला सडेतोड उत्तर दिले. बाप काढले, माझाही बापही जिंवत आहे. माझी आई गेली. एकदा उद्धव ठाकरेंचा गावी असताना फोन आला होता, तेव्हा आईने सांगितलं, माझ्या बाळाला सांभाळा, त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तू इतका मोठा झाला तरी आई तुला बाळा म्हणायचे. मी रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा ती झोपलेली असायची. वडिला कामाला गेलेले असायचे. श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला. माझ्या आयुष्यात दुखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. त्यावेळेस मला आधार दिला, आनंद दिघे साहेबांनी आधार दिला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले. गेल्या दहा दिवसांपासून 50 आमदार हे सातत्याने विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस केले. त्यांचे मी अभिनंदन करतो. मला आता विश्वासही बसत नाही, या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलत आहे. या महाराष्ट्राच्या अनेक घटना पाहिल्या असतील, खासदार, आमदार किंवा नगरसेवक असतील तर ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण, पहिल्यांदाच अशी घटनेची नोंद फडणवीस यांनी सांगितले की, 33 देशांनी नोंद घेतली आहे. स्वतचं आमदार, मंत्रिपद डावावर लावून सगळे जण हे आमच्यासोबत आले, समोर एवढे मोठे मंत्री, नेते, सत्ता आणि यंत्रणा होती. पण, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. आम्ही ज्या दिवशी विधानभवनातून निघालो तो आधी मी व्यथित होतो. ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागले होते, त्याची साक्षीदार इथं बसलेले आमदार आहे, असंही शिंदे म्हणाले. 'स्वत:च आमदार, मंत्रिपद डावावर लावून सगळे जण हे आमच्यासोबत आले, समोर एवढे मोठे मंत्री, नेते, सत्ता आणि यंत्रणा होती. पण, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. आम्ही ज्या दिवशी विधानभवनातून निघालो तो आधी मी व्यथित होतो. ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागले होते, त्याची साक्षीदार इथं बसलेले आमदार होते.बाळासाहेबांनी नेहमी अन्यायाविरोधात बंड पुकारण्याचे सांगितले. मला त्यावेळी काय झालं काही कळत नव्हतं. मी लोकांना फोन लावले आणि मोहिम सुरू केली. मला मुख्यमंत्र्यांनी फोन करून विचारलं, कुठे चाललाय, कशाला चाललाय आणि कधी येणार, असं विचारलं मी सांगितलं कधी येणार हे सांगितलं नाही. अजितदादा हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल पण मागे येणार नाही, असं ठरवलं होतं, असं शिंदेंनी ठणकावून सांगितलं. 'मी आमदारांना विश्वास दिला होता, तुमची आमदारकी, तुमचे भवितव्य काय असेल हे यासाठी मी लढेन, जोपर्यंत तुमचं भलं होत नाही, तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. तुमची आमदारकी मिळाल्यानंतर मी जगाचा निरोप घेईन, असंही शिंदे म्हणाले. 'एकीकडे माझ्याकडे बोलण्यासाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे माझ्यावर दुषणं लावली, टीका केली, पुतळे जाळून टाकले. घरावर दगडं मारण्याची भाषा केली, पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून कुणी पैदा झाला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे, माझ्यावर प्रेम करणारी किती माणसं आहे, मी निघालो तर लोकांचा मधमाशांचा मोहोळ उठतो, माझ्यावर चालून आले तर ही लोक त्यांना डसून संपवून टाकेल' असा इशाराही शिंदेंनी दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या