COVID-19: BMCचं पथक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर, आरोग्य कर्मचाऱ्यांना महानायकाने दिला सुखद धक्का!

COVID-19: BMCचं पथक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर, आरोग्य कर्मचाऱ्यांना महानायकाने दिला सुखद धक्का!

सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दडपण जाणवत होतं. मात्र अमिताभ यांनी आपल्या सहज वागण्याने काही मिनिटांमध्येच ते दडपण दूर केलं.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोबर: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’  ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सरकारचे आरोग्य कर्मचारी घरो घरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत. महापालिका, नगरपालिका, आरोग्य विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने यासाठी सर्व्हे केला जातो. याच सर्व्हेसाठी आरोग्य विभागाचं पथक शनिवारी बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर गेलं होतं. अमिताभ बच्चन यांनी या कर्मचाऱ्यांच स्वागत करत सगळी माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्यर्या यांना कोरोनाची लागण झाली आणि ते त्यातून बरेही झालेत. त्यामुळे अमिताभ यांनीही घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपली आणि कुटुंबाची माहिती सांगितली.

महानायक अमिताभ बच्चन यांनी ज्या सहजतेने सर्व माहिती दिली त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुखद धक्का बसला. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दडपण जाणवत होतं. मात्र अमिताभ यांनी आपल्या सहज वागण्याने काही मिनिटांमध्येच ते दडपण दूर केलं. या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य केलं तरच कोरोनाला अटकाव करता येईल असंही बच्चन यांनी सांगितलं. त्यांनी या मोहिमेचं कौतुकही केलं.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतली घट सलग गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 89 टक्क्यांच्या जवळ गेलं आहे. शनिवारी राज्यात 10,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6,417 रुग्णांची नव्याने भर पडली. राज्यात 137 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 एवढी झाली आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,40,194 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 10:20 PM IST

ताज्या बातम्या