Home /News /mumbai /

"ठाकरे-पवार एकत्र पाहून भाजपला पोटदुखी, मविआ सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती": संजय राऊत

"ठाकरे-पवार एकत्र पाहून भाजपला पोटदुखी, मविआ सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती": संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील घडामोडींवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई, 11 फेब्रुवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील विविध भागांतील विकास कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. आदित्य ठाकरे यांच्याहाती गाडीचं स्टेअरिंग होतं तर त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे आणि पवारांना एकत्र पाहून भाजपच्या (BJP) पोटात दुखतं असंही राऊत म्हणाले. मविआचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती संजय राऊत म्हणाले, उत्तम आहे. हिच तर भाजपची कळ आहे, पोटात कळ येते ना? कळ वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांना कळ त्यामुळेच येत आहे. दबावाचं राजकरण करुन, धमक्यांचं राजकारण करुन सुद्धा महाविकास आघाडी सरकारला तडा जात नाही आणि तो कधीच जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे आणि तो राहील. वाचा : BMC Election: शिवसेनेची रणनिती ठरली; 125 जागा जिंकणार, मोठ्या नेत्याचा दावा भाजप 40 पैकी 42 जागा जिंकणार गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांनाच वाटतं की बहुमत आपल्याला मिळणार आहे. आत्मविश्वास चांगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही झाल्या, तेथे पाहिलं काय झालं ते. देवेंद्र फडणवीस बोलतात ते बरोबर बोलतात, मी तर बोलतो 40 पैकी 42 जागा भाजप जिंकेल असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. वाचा : राम कदम पडले तोंडघशी, लतादीदींच्या स्मारकाचे राजकारण थांबवा, मंगेशकर कुटुंबीयांची विनंती गोव्यात लोकसभा निवडणुकही लढवणार गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना अकरा जागा लढत आहे. उद्या शिवसेनेचा गोवा निवडणुकीचा जाहीरनामा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर होणार. विधानसभा निवडणूक संपल्यावर गोव्यात आम्ही लोकसभेची तयारी सुरू करणार आहोत. दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. आमची तयारी काय आहे हे विरोधक सांगू शकतील. गोवा विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर सरकारमध्ये सहभागी होऊ, आमचे आमदार निवडून येणं महत्वाचे आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे-पवारांचं 'मिशन मुंबई', आदित्य ठाकरे-अजितदादांचा एकाच गाडीतून प्रवास राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी मतदारसंघाचा दौरा केला. वरळी मतदारसंघातील विकास कामांची दोन्ही मंत्र्यांनी पाहणी केली. वरळी हा मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून पोहोचले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: गाडी चालवत होते तर त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aaditya thackeray, Ajit pawar, BJP, Maharashtra, Mumbai, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या