Home /News /mumbai /

BREAKING : ठाकरे सरकारकडे आता पर्याय संपले, राज्यपालांच्या हाती आता सगळे निर्णय

BREAKING : ठाकरे सरकारकडे आता पर्याय संपले, राज्यपालांच्या हाती आता सगळे निर्णय

आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण...

आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण...

आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण,

    मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४६ आमदारांचा गट तयार झाल्याचा दावा केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण, याचा निर्णय हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हातात असणार आहे. राज्यपालाचं अंतिम निर्णय घेऊ शकतात. महाविकास आघाडी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या