मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष आणि पुढेही टिकेल, शरद पवारांनी केलं स्पष्ट

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष आणि पुढेही टिकेल, शरद पवारांनी केलं स्पष्ट

 'शिवसेनेला महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप वर्ष पाहिले आहे. शिवसेना हा एक विश्वास आहे'

'शिवसेनेला महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप वर्ष पाहिले आहे. शिवसेना हा एक विश्वास आहे'

'शिवसेनेला महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप वर्ष पाहिले आहे. शिवसेना हा एक विश्वास आहे'

मुंबई, 10 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, हे सरकार भक्कम मजबूत आहे. महाविकास आघाडी सरकार नुसते पाच वर्ष नाहीतर, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा  उत्तमरित्या काम करणार आहे', असा विश्वासही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन (22nd anniversary of the Nationalist Congress Party) साजरा होत आहे. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकाराच्या कामाचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

'आपण वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केले. आपण शिवसेनेसोबत काम कधी केले नाही. पण शिवसेनेला महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप वर्ष पाहिले आहे. शिवसेना हा एक विश्वास आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पुढे आली.  त्यांच्यासोबत एकत्र आलो,  कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष चालेल आणि त्यानंतर सुधा पुढे एकत्रित चांगले काम करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

'नुसते पाच वर्ष नाहीतर, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी सरकार हे उत्तमरित्या काम करणार आहे', असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

'राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र चर्चा केली. त्यानंतर वेगवेगळ्या शंका आणि चर्चा सुरू झाल्या. पण हे लक्षात घ्या की महाविकास आघाडी पक्षासोबत सर्व पक्ष आहे, असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.

'या संकटावर आपण मात करू शकतो हा विश्वास त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केला. राजकारणात सतत नवीन पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे. उद्या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे त्यांना ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण त्यांना तयार केले पाहिजे', असंही शरद पवार म्हणाले.

'तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा.  आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे. लाखांच्या संख्येनं आपण जमलो आणि शिवाजीपार्कवर जमलो आणि महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. हा निर्णय संपूर्ण देशानी लोकांनी स्विकारला, असंही पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Shivsena, Uddhav thackeray