Muslims and Pets not allowed! मुंबईतील या जाहिरातीवर लोकांनी व्यक्त केला संताप

Muslims and Pets not allowed! मुंबईतील या जाहिरातीवर लोकांनी व्यक्त केला संताप

गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबई, पुण्यातून अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : कोणत्याही जाती-धर्माच्या किंवा कोणत्याही स्तरावरील लोकांसाठी मुंबई कायम खुली असते. विविध राज्यांमधून नागरिक नोकरीच्या शोधात मुंबईत येतात आणि इथलेच होऊन जातात. मात्र मुंबईत राहणं हे तितकं सोप नाही. लहान लहान खोल्या मात्र भाड्यांची संख्या मात्र मोठी मोठी..असं साधारण मुंबईच स्वरुप आहे. अशातच मुंबईसंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील सध्या व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये एक घर भाड्याने देणं असल्याची जाहिरात आहे. मुंबईतील खारमध्ये हे घर 1 लाख 40 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोटो पाहून तर हे घर खूप सुंदर असल्याचं दिसत आहे. याशिवाय पार्किंगची सोयही आहे. मात्र एक अडचण आहे. या जाहिरातीत घरमालकाने अनेक अटी दिल्या आहेत. त्या अटींमध्ये त्याने लिहिलं आहे की, पेट्स म्हणजेच पाळीव प्राणी आणि मुस्लिमांना परवानगी नाही. एका पत्रकाराने याचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, हा मुंबईतील उच्चभ्रू भाग आहे. आणि अशा प्रकारची जाहिरात करणं कितपत योग्य आहे.

या पोस्टनंतर अनेकांनी आपले अनुभव व मत यावर व्यक्त केले आहेत. अनेक मुस्लीम तरुण-तरुणींना असा अनुभव आला आहे. यातील एका व्यक्तीने लिहिलं आहे की, आतापर्यंत अशा घटना केवळ मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये होत होत्या. मात्र आता नाशिकसारख्या ठिकाणीही मुस्लिमांना घर नाकारलं जातं.

Published by: Meenal Gangurde
First published: October 26, 2020, 8:11 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या