Elec-widget

मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील

मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील

हिवाळी अधिवेशनात आज मराठा आरक्षण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.

  • Share this:20 नोव्हेंबर : मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षण नाही अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केली. मुस्लिम समाजातील मागास जातींना आरक्षण आहे त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.


हिवाळी अधिवेशनात आज मराठा आरक्षण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत असताना मुस्लिम आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट केली.

Loading...


मुस्लिम आरक्षणाबाबत धर्मावर आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजातील इतर जाती ज्या आहेत त्यांना ओबीसी वर्गानुसार आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजातील इतर जाती आहे त्यांना आधीच आरक्षण सुरू आहे असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.


आमची हीच अपेक्षा होती, सरकार हे असेल उत्तर देणार आहे. दुर्दैवाने आज सरकारने हे स्पष्ट करून दाखवलं. आघाडी सरकारने सुद्धा हेच केलं. आता भाजप सरकार सुद्धा हेच करत आहे अशी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. तसंच आम्हाला जातीच्या आधारावर तुम्ही आरक्षण दिले तरी आम्ही घेणार नाही, मुस्लिम समाजात आर्थिक आणि मागास असलेल्या वर्गाला आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे पण मुळात सरकारचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे अशी टीका जलील यांनी केली.


तर भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मुस्लिम समाजात जे सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत, त्यांना 5 टक्के आरक्षण दिले आहे. न्यायालयाने ते मान्य केलाय मग आरक्षण का नाकारत आहेत असा सवाल आमदार अमीन पटेल यांनी विचारला.


दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारला पुरतं घेरल्याचं बघायला मिळतंय. आरक्षण अहवाल सभागृहात मांडण्याच्या मागणीवर विरोधक आजही ठाम आहेत. त्यासाठी सकाळीच पायऱ्यांवर आंदोलनही करण्यात आलं त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावरूनही सभागृहात गदारोळ झाला, सरकार फक्त दुष्काळ जाहीर करून मोकळं झालंय, उपाययोजना कधी करणार, असा परखड सवाल विरोधकांनी केलाय. दुष्काळग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.


=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2018 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...