धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 3 फेब्रुवारी : संगीत नसलं तर आपल्या सर्वांचंच आयुष्य हे नीरस झालं असतं. आपल्याला प्रसन्न करण्याचं काम हे संगीत करतं. संगीताला साज चढवण्याचं काम हे वाद्य करतात. ही वाद्य वाजवायला, त्याचा सुमधूर ध्वनी ऐकायला अनेकांना आवडते. मुंबईतील कुर्ल्यात पारंपारिक पद्धतीनं वाद्य तयार करणारं दुकान आहे. या दुकानात बनवलेल्या वाद्याची विक्री ही फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर तसंच विदेशातही होते.
मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणारे नंदकुमार थोरवे गेल्या 40 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. कुर्ल्यातील बहुचर्चित सर्वेश्वर मंदिर मार्गावर थोरवे यांचे सर्वेश्वर म्युझिकल नारायण धोंडिबा थोरवे अँड सन्स हे दुकान आहे. भजन आणि वारकऱ्यांना लागणाऱ्या वाद्यसाहित्यांची इथं निर्मिती होते. त्याचबरोबर या दुकानात वाद्यांची दुरुस्तीचीही कामं केली जातात.
नंदकुमार यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून सहा भावंडं आजही हा व्यवसाय सांभाळतात.आजही त्यांचे हे काम जोमाने सुरू आहे. ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदूंग, तबला, गिटार, हार्मोनियम, नगारा, गाजी ढोल, कच्छी ढोल, पंजाबी ढोल, ताशा या प्रकारचे पारंपारिक वाद्य इथं बनवून मिळतात. वाद्य बनवताना त्याच्या तालाची योग्यता तपासूनच ग्राहकांच्या हातात वाद्य सुपूर्त केले जातात.
पुरुषी मक्तेदारीला छेद देत ढोलकी वाजवणारी मराठी मुलगी, पाहा Video
कसा सुरू झाला व्यवसाय?
'नंदकुमार थोरवे यांचे वडील लहानपणी मुंबईला कामाच्या शोधात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वाद्य निर्मितीच काम शिकलं आणि 1985 रोजी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज हा वडिलोपार्जित व्यवसाय आम्ही सहा भावंडं सांभाळतो. संपूर्ण महाराष्ट्रात थोरवे अँड सन्स हे नाव असून आम्ही तयार केलेल्या वाद्यांना मागणी आहे.
ही वाद्य परदेशी सुध्दा पाठविली जातात. युरोपमध्ये प्रामुख्यानं हार्मोनियमची विक्री केली जाते. हार्मोनियम ही स्पेशलीटी असल्यामुळे ते जास्त तयार करण्यात येतात. त्याच बरोबर तबला, डग्गा, पकवाज, गिटार, ढोलकी, असे अनेक वाद्य हाताने तयार केली जातात,' अशी माहिती नंदकुमार यांनी दिली.
'बदल हा निसर्गाचा नियम आहे. आज कालची तरुण पिढीला नवीन वाद्यांची आवड आहे मात्र मुख्यतः पारंपरिक वाद्य बंद होऊ शकत नाही ती सुरूच राहणार. कोरोनाच्या आधी दुकानाची परिस्थिती चांगली होती मात्र लॉकडाऊन नंतर कामगार कमी करावे लागले. आता स्वतः भावंडं काम करून आमचा उदरनिर्वाह करत असतो. त्याच बरोबर कोणाला ही कला शिकायची असेल तर आम्ही शिकवायला तयार आहोत. हे शिकण्यासाठी तासंतास बसून काम करावं लागत त्यामुळे तरुण पिढी या क्षेत्राकडे आता वळत नाहीत,' अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.