News18 Lokmat

संगीतावर ताल धरणारी हजारो रंगीबेरंगी कारंजी... जवान आणि कुटुंबीयांसाठी मुंबईत रंगारंग सोहळा

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने खास भारतीय सैन्यदलासाठी, पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो आयोजित करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 08:41 PM IST

संगीतावर ताल धरणारी हजारो रंगीबेरंगी कारंजी... जवान आणि कुटुंबीयांसाठी मुंबईत रंगारंग सोहळा

मुंबई, 12 मार्च : हजारो कारंजी संगीताच्या तालावर फेर धरताहेत, चकचकीत पार्श्वभूमीवर सुरू असलेली संगीतमय लखलख अला रंगारंग सोहळा मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रंगला. हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो नुकताच सुरू करण्यात आला. याच्या उद्घाटनाचा हा खास शो भारतीय सैन्यदलासाठी, पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला.

मंगळवारी (12 मार्च) संध्याकाळी हा खास उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गेल्याच आठवड्यात धीरुभाई अंबानी स्केअरचं उद्घाटन झालं. तिथेच हा म्युझिकल फाउंटन शो होत आहे.


नीता अंबानी या सोहळ्याच्या उद्घाटनावेळी सैन्यदलाचे जवान आणि कुटुंबीयांचं स्वागत करताना सांगितलं की, "आज 130 कोटी भारतीयांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदराची भावना आहे. तुम्ही काल आमच्या रक्षणाला होतात, म्हणून आम्ही आज इथे आहोत. तुम्ही तिथे उद्याही असणार आहात आणि कायम आमचं रक्षण करणार आहात. आम्हा सर्व भारतवासीयांची सुरक्षा तुमच्या हाती देऊन आम्ही सुखाने जगत आहोत. तुम्ही आम्हा सगळ्यांच्या परिवाराचा एक भाग आहात. "


Loading...

हा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षा जवानांना समर्पित करण्यात आला होता.


या रंगारंग सोहळ्याची क्षणचित्रं...यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुंबईत तैनात असलेल्या तब्बल 50 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मुलाच्या लग्नानिमित्त मिठाई पाठवली होती. गेल्या बुधवारी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मुलांना जेवण दिले होते. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अन्न सेवा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी धीरुभाई अंबानी स्केअरचे उद्घाटन केलं होतं. या कार्यक्रमातही मुलांनी म्युझिकल फाऊंटनचा आनंद घेतला होता.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...