शीना बोरा प्रकरणातले आरोपी पीटर-इंद्रायणी मुखर्जींना हवा घटस्फोट! तुरूंगातून केला अर्ज

शीना बोरा प्रकरणातले आरोपी पीटर-इंद्रायणी मुखर्जींना हवा घटस्फोट! तुरूंगातून केला अर्ज

सध्या पीटर आणि इंद्रायणी मुखर्जी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुगांत आहे. इंद्रायणीने २००२मध्ये प्रसार माध्यम क्षेत्रातील पीटर मुखर्जीशी लग्न केलं होतं

  • Share this:

27 एप्रिल:  शीना बोरा हत्येमुळे चर्चेत आलेल्या पीटर मुखर्जी आणि इंद्रायणी मुखर्जीला घटस्फोट हवा आहे. यासाठी या जोडीने कोर्टाकडे तसा अर्ज केलीय.

सध्या पीटर आणि इंद्रायणी मुखर्जी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुगांत आहे. इंद्रायणीने २००२मध्ये प्रसार माध्यम क्षेत्रातील पीटर मुखर्जीशी लग्न केलं होतं. आर्थर रोड तुरुंगात इंद्रायणीपासून काही भिंतींच्या पलिकडील बराकीत कैद असलेल्या पीटरला इंद्राणीने स्पीड पोस्टने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

इंद्रायणीने  पीटरला  सहमतीने घटस्फोट देण्याची मागणी केली असून त्याच्या संपूर्ण संपत्तीतला अर्धा हिस्सा मागितला आहे. १६ वर्षं लहान असलेल्या इंद्रायणीशी लग्न केल्यामुळे पीटर मुखर्जी चर्चेचा विषय ठरला होता. शीना बोरा ही इंद्रायणीची मुलगी होती. नात्याची गुंतागुतीमुळे २०१२मध्ये इंद्रायणीने शीनाची हत्या केली होती. या प्रकरणात या दोघांसोबत इंद्रायणीचा पहिला नवरा संजीव खन्ना ही तुरुंगात आहे. या तिघांविरोधात  कोर्टाने हत्या आणि हत्येचा कट रचलाचं आरोप निश्चित केलाय.

आता तुरूंगातून अर्ज केलेल्या या जोडप्याला घटस्फोट मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे.

First Published: Apr 27, 2018 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading