मित्राचीच बायको नेली पळवून.. जाब विचारणाऱ्याच्या भावाचीच केली हत्या

मित्राचीच बायको नेली पळवून.. जाब विचारणाऱ्याच्या भावाचीच केली हत्या

एकाने मित्राची बायको पळवून नेल्यावरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे ही घटना घडली आहे.

  • Share this:

विजय देसाई, (प्रतिनिधी)

नालासोपारा, 5 ऑगस्ट- एकाने मित्राची बायको पळवून नेल्यावरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे ही घटना घडली आहे. जावेद सरवर (वय-20) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे मित्राच्या बायकोला पळवून नेणाऱ्यास जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या करण्यात आली. जाब विचारणारा न भेटल्याने त्याच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत जावेद सरवर हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवत होता.

जावेदचा भाऊ नावेद याचा मित्र मुश्ताक याच्या बायकोला उस्मान याने पळवून नेले. त्याचा जाब नावेदने विचारला होता. त्याचा राग मनात धरून काही लोक नावेदला मारण्यासाठी आले होते. मात्र, तो न भेटल्याने त्याचा भाऊ जावेदवर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

भिवंडीत घराचे छत कोसळले 4 जखमी

दुसऱ्या एका घटनेत घराचे छत कोसळून 4 जण जखमी झाले आहेत. भिवंडी शहरातील किडवाई नगरात चांदणी हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. नवीन इमारतीचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने घराचे छत कोसळले. यात 4 जखमी जण जखमी झाले असून त्यात 1 लहानगा आणि 3 महिलांचा समावेश आहे. बनोबी शेख हुसैन (61) , रुसबा शेख हुसैन (24) , लतीफा कायूम शेख (35) आणि हमजा इमरान शेख (दीड वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या