कोचिंग क्लास मालकाची कर्मचाऱ्याने केली हत्या, चॉपरने केले सपासप वार

कोचिंग क्लास मालकाची कर्मचाऱ्याने केली हत्या, चॉपरने केले सपासप वार

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास मालकाची त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई,22 सप्टेंबर: घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास मालकाची त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयांक ट्युटोरियलचे मालक मयांक मांडोर यांची क्लास सुरू असताना चॉपरने सपासप वार करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

पंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मारेकरी गणेश पवार याला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेली माहिती अशी की, मयांक ट्युटोरियलचा कर्मचारी गणेश पवार यान क्लासमध्येच चॉपरने मयांक याच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गणेशने त्याच्या मालकांची हत्या का केली, या मागील नेमके कारण समजू शकले नाही.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

Published by: Sandip Parolekar
First published: September 22, 2019, 8:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading