मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Local : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, लोकलबाबत होणार फेरविचार

Mumbai Local : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, लोकलबाबत होणार फेरविचार

मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलची (Mumbai Local) सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in Mumbai) पुन्हा एकदा वाढ होत असल्यानं लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 16 फेब्रुवारी : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलची (Mumbai Local) सेवा कोरोना संसर्गामुळं (Coronavirus) गेल्या अनेक महिन्यापासून बंद होती. अशात फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र दिसल्यानं 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in Mumbai) पुन्हा एकदा वाढ होत असल्यानं लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत 22 फेब्रुवारीला आढावा घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

याविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की रूग्णांच्या संख्येत 10 ते 20 टक्के वाढ होत राहिल. मात्र, 22 फेब्रुवारीला होणाऱ्या आढावा बैठकीत रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षणात आल्यास लोकलबाबत वेगळा निर्णय घेण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून त्यानंतर पावलं उचलली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, यात आणखी एक सकारात्मक बाजू अशी, की रूग्णसंख्या कमी झाल्याचं आढळल्यास आणखी शिथिलतेबाबतही निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या -

मागील दोन आठवड्यांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांचया संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. जानेवारी महिन्याचा विचार केल्यास दिवसाला साधारणतः 300 ते 350 रूग्ण रोज आढळून यायचे. मात्र, हा आकडा आता दुप्पटीनं वाढला आहे. सध्या दिवसाला जवळपास 600 ते 650 रूग्णांची नोंद होत असल्याची स्थिती आहे. लोकलचया निरीक्षणासाठी महापालिकेनं 15 दिवसांचा कालावधी ठेवला होता. हा कालावधी 21 फेब्रुवारीला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर 22 तारखेला रूग्णसंख्येचा आढावा घेण्यात येणार आहे. मात्र, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असल्यानं मुंबईकरांची धाकधुक मात्र वाढली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai local, Mumbai muncipal corporation