S M L

गोरेगावच्या स्कायवॉकच्या खांबांवर पालिकेनं साकारलं 'व्हर्टिकल गार्डन'

दुबई, सिडनी, सिंगापूरप्रमाणेच गोरेगावमध्ये पालिकेने स्कायवॉकच्या खांबांवर 'व्हर्टिकल गार्डन' साकारलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 11, 2018 08:40 AM IST

गोरेगावच्या स्कायवॉकच्या खांबांवर पालिकेनं साकारलं 'व्हर्टिकल गार्डन'

मुंबई, 11 मे : दुबई, सिडनी, सिंगापूरप्रमाणेच गोरेगावमध्ये पालिकेने स्कायवॉकच्या खांबांवर 'व्हर्टिकल गार्डन' साकारलं आहे. गोरेगाव स्टेशनला पश्चिमेकडून पी दक्षिण विभाग कार्यालयाकडे जाणाऱ्या स्कायवॉकच्या पाच खांबांवर ७ हजार ४७६ रोपटी 'व्हर्टिकल' पद्धतीने लावली आहेत. यामुळे स्कायवॉकच्या खालचा परिसर हिरवागार आणि आकर्षक दिसू लागला आहे. 289722

विशेष म्हणजे ही रोपटी लावताना हिरव्या आणि बड्या पानांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. या रोपट्यांमध्ये सिंगोनियम (Syngoniumed), मनी प्लांट (Moneyed Pledant), स्पिंग्री (Spingaried) या तीन प्रकारच्या झाडांची प्रत्येकी १ हजार ६८० रोपटी लावण्यात आली आहेत. तर पेन्डॅनस (Pendanueds) आणि सिक्रेशिया (Secedretieda) या प्रजातींची अनुक्रमे ९२४ आणि १ हजार ५१२ एवढी रोपटी लावण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडतेय.

सुमारे साडेसात हजार रोपटी लावण्यासाठी 'स्कायवॉक'च्या खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करून कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये रोपटीदेखील वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनेच लावण्यात आली आहेत. या कुंड्यांचे वजन तुलनेने कमी असणे आवश्यक असल्याने कुंड्यांमध्ये केवळ मातीऐवजी कोकोपीट, पीटमॉस, लाकडी कोळसा, झाडांच्या पानांचा भुगा, जैविक खत, व्हर्मिकोलाइट इत्यादी बाबी वापरण्यात आल्या आहेत.

या 'व्हर्टिकल' उद्यानातील रोपट्यांना दिवसातून दोन वेळा 'ड्रीप एरिगेशन' पद्धतीने पाणी देण्यात येत आहे. या उद्यानाच्या देखभालीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी नियमितपणे कार्यरत आहेत. केवळ महिनाभराच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या या उद्यानासाठी महापालिकेला सुमारे १५ लाख रुपये खर्च आला आहे.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2018 08:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close