मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2017 04:00 PM IST

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

29 मार्च : मुंबई महानगरपालिकेचा 2017-18चा अर्थसंकल्प आज मनपा आयुक्त अजाॅय मेहतांनी सादर केला. मुंबई महानगरपालिकेचा 25,141 कोटींचा अर्थसंकल्प सादर  करताना आयुक्तांनी पालिकेचा आधुनिक कारभारावर भर देणार असल्याचं सांगितलं.

पारदर्शक कारभार, जबाबदारी, काटकसर, विकास आराखड्याशी संलग्नता, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर या पाच मुख्य मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. मुंबईकरांना उत्तम सुविधा देण्यास प्रशासन बांधिल असेल, असेही ते म्हणाले.

या बजेटमुळे पालिकेतल्या नोकऱ्या घटणार आहेत, कारण अनेक पदांची कामं आता एकाच पदामार्फत पार पाडली जातील. उदा. लघुलेखक, लिपिक, दूरध्वनी ऑपरेटरची कामं यांच्यासाठी एकच पद असेल. कार्यकारी सहाय्यक त्यासाठी काम करेल.

या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद केलीय. तर गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद आहे.

मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी 1095 कोटींची तरतूद केलीय, पण  तोट्यात असलेल्या बेस्टसाठी भरीव तरतूद केलेली नाही.

Loading...

गेल्या वर्षीपेक्षा या अर्थसंकल्पात 83 कोटींची घट आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...