S M L

मूग,उडीदची पाहिजे तेवढी खरेदी झाली नाही -राधामोहन सिंग

ग्रेडींग करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पारदर्शकपणे काम केलं जात नाही त्यामुळे ही खरेदी झाली नाही

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2017 04:42 PM IST

मूग,उडीदची पाहिजे तेवढी खरेदी झाली नाही -राधामोहन सिंग

11 नोव्हेंबर : मूग आणि उडीदची जेवढी खरेदी झाली पाहिजे तेवढी खरेदी झालेली नाहीये असं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केलंय. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ग्रेडींग करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पारदर्शकपणे काम केलं जात नाही त्यामुळे ही खरेदी झाली नाही असा आरोपही त्यांनी केला.  तसंच नाफेडच्या लिस्टमध्ये जे ऑल इंडिया लेव्हलचे ग्रेडर आहेत त्यांची नियुक्ती उद्यापासून केली जाईल आणि खरेदीनंतर ३ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असंही ते म्हणाले.

अवकाळी पावसामुळे जे वातावरण खराब झालं त्याने काही पिकांचं नुकसान झालंय,  त्यालाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, असंही ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close