मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट व्हायरल

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट व्हायरल

'तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही'

'तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही'

'तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet Reshuffle) जम्बो विस्तार झाला आहे. राज्यातून 4 जणांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. परंतु, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांच्या कन्या आणि  माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहे. 'ही तर फक्त सुरुवात आहे..'असं म्हणत समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते, हे ठणकावून सांगण्यात आले आहे. ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे.

नीतू कपूर कशा पडल्या ऋषी कपूर यांच्या प्रेमात? पाहा अभिनेत्रीची अनोखी लव्हस्टोरी

तसंच, 'तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही. हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे' असं म्हणत समर्थकांनी भावनिक सादही घातली आहे.

काय आहे ती पोस्ट ?

24-25 मे 2014,खा.गोपीनाथ मुंडे यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश होणार नाही अशा चर्चा.

हो हो नाही नाही करत अखेर साहेबांचा शपथविधी झाला.लोक आनंदाने वेडेपिसे झाले. रड रड रडले. आज प्रीतमताईंचा समावेश झाला असता तर जवळपास तेच चित्र राज्यभर पहायला मिळालं असतं !

असं का झालं नसेल बर !

कुरघोडींचं राजकारण की अजून काही ?

आठवतो का तुम्हाला मुंडे भगिनींचा प्रवास ?

• पुन्हा संघर्ष यात्रेस गावोगावी अभुतपुर्व प्रतिसाद ,भगवानगडावर 2014 साली लाखोंचा भावनिक समुदाय ऊरात धडकी भरवणारा.

• 2014 साली मुंबईत मंत्रिमंडळात तुमच्या नावाची घोषणा होताच उपस्थित सर्व महामहीमांपेक्षा अधिक प्रतिसाद.

• 2014 लोकसभा पोटनिवडणुकीत सर्व विक्रम मोडणारं मताधिक्य..

• 2017 साली देशाचं लक्ष वेधणारी गोपीनाथगड-भगवानगड रॅली.

• स्वपक्षीयांनी षडयंत्रं करुनही दरवर्षी भगवानभक्तीगडावर लाखोंचा समुदाय आणि चर्चा फक्त तुमच्याच दसरा मेळाव्याची.

• लोकसभेच जातवार जनगननेची मागणी करताना तुम्ही वडिलांप्रमाणेच वंचित शोषितांचा आवाज बनण्याची चुणूक दाखवता.

• तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही.

अरे लेकरांनो,हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो?

राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे हवे आहेत जनसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे, कुठल्याही अटीशिवाय फोनवर कामं करणारे, अर्ध्या रात्री फोन उचलणारे. मुलगामी विचारांच्या पक्षात राहून लोकगामी नितींचा अवलंब करत राजनिती करणारे...अन्याय दडपण वेदना सोसत पक्षाशी निष्ठा जपत जपत वंचित पीडित शासित शोषितांच्या ‘वेदना आणि वाणी’ सोबत अधिक प्रखर निष्ठा जपत विरोधकांशी थेट भिडणारे…

आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे.

ही तर सुरुवात आहे…!

First published: