Home /News /mumbai /

BEST झालं! मुंबईच्या रस्त्यांवर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस, 900 AC बसची बेस्टची ऑर्डर

BEST झालं! मुंबईच्या रस्त्यांवर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस, 900 AC बसची बेस्टची ऑर्डर

(Image Source: Aaditya Thackeray/Twitter)

(Image Source: Aaditya Thackeray/Twitter)

या बसेसमुळे एकावेळी अधिक प्रवाशांची वाहतूक शक्य होते. त्यामुळं बेस्टनं पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर डबल डेकर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र आता या बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत.

मुंबई, 29 जानेवारी: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची (Transportaion in Mumbai) लोकल सेवा जशी सगळ्या देशात प्रसिद्ध आहे, तशीच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्टची (BEST) बस सेवाही (Bus service)प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी नाविन्यपूर्ण डबल डेकर बसेस आणण्यातही बेस्टनं आघाडी घेतली होती, मात्र कालांतरानं तिचा वापर कमी झाला. सध्या मुंबईत काही निवडक मार्गावर फक्त 48 नियमित डबल डेकर बसेस (Double Decker BEST buses in Mumbai) आहेत. मुंबई दर्शनसाठी डबल डेकर बसचा वापर केला जातो. आजही या डबल डेकर बसेसबद्द्लचं प्रवाशांचे आकर्षण कायम आहे. तसंच या बसेसमुळे एकावेळी अधिक प्रवाशांची वाहतूक शक्य होते. त्यामुळं बेस्टनं पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर डबल डेकर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र आता या बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत. मनी कंट्रोलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुंबईसाठी बेस्टतर्फे 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बस (Electric Double Decker Buses) खरेदी करण्यात येणार असून, राज्य सरकारनंही (State Government) याला परवानगी दिली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसातच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल डेकर बसेस धावताना दिसणार आहेत आणि अनेकांना आपल्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. हे वाचा-12आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द करताच भास्कर जाधवांनी केलं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मुंबईत पुन्हा एकदा डबलडेकर बसेस आणायच्या आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असून, त्यात जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणायच्या आहेत. सध्या बेस्ट समितीने 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेससाठी 12 वर्षांच्या कराराला मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. यासाठी सुमारे 3600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सध्या राज्य सरकारने यासाठी 992 कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत हा निधी देण्यात आला आहे. पहिल्या बॅचमधील 225 डबलडेकर बसेस यावर्षी दाखल होऊ शकतात. तर दुसऱ्या तुकडीत 225 बस पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित 450 बसेस जून 2023 पर्यंत पोहोचवल्या जातील, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र (Lokesh Chandra) यांनी दिली. हे वाचा-टीपू सुलतान मैदान वादाला नवे वळण, भाजपने केला नवा दावा खरेदी करण्यात येणाऱ्या 900 नवीन एसी इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक (Environment Friendly) असतील. दशकभराहून अधिक काळ या बसेस रस्त्यावर असतील. यामुळे आमच्या ताफ्यात भर पडेलच पण आमची प्रवासी क्षमताही सुधारेल आणि गर्दीच्या वेळेत ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी कमी होईल, असंही लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मुंबईसह इतर नगरपालिकांनाही (Municipal Corporations) त्यांच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची विनंती केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील बससेवेची क्षमता वाढेल आणि लोकांची गैरसोय दूर होईल, असं त्यांनी नमूद केलं.
First published:

Tags: Best

पुढील बातम्या