मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2017 09:51 AM IST

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी

29 डिसेंबर :लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे.

अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून, सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोसमध्ये ही आग लागली. बघता बघात आग वा-यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळच असलेल्या हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.

मोजोस हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोसच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये tv9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल, खुशबू, मनीषा शहा, प्राची शहा, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी, विश्व ललानी या 1४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 02:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close